एक्स्प्लोर
बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा वाद, उद्धव ठाकरेंची ‘ही’ मागणी हायकोर्टाला अमान्य

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रावर सुरू असलेल्या सुनावणीत जयदेव ठाकरे यांनी सादर केलेल्या ठाकरे कुटुंबियांच्या माहितीची नोंद करून घेऊ नये, ही उद्धव ठाकरे यांची मागणी उच्च न्यायालयाने अमान्य केली आहे. मृत्यूपत्राच्या वादात कुटुबियांचा तपशील देणे व्यवहार्य नाही व त्याचा काही उपयोग नाही. तेव्हा जयदेव यांनी सादर केलेल्या कुटुंबियांच्या माहितीची नोंद करून घेऊ नये, अशी मागणी करणारा अर्ज उद्धव यांनी केला होता. त्यावर न्यायाधीश गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने उद्धव यांची मागणी मान्य केली नाही. जयदेव यांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी कुटुंबियांची माहिती दिली आहे. त्यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही, असे नमूद करत न्यायालयाने हा अर्ज निकाली काढला. जयदेव यांनी कुटुंबियांच्या माहितीसह बाळासाहेबांशी संबंधित नऊ कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत. बाळासाहेबांवर लिलावती रूग्णालयात सुरू होते. याविषयीच्या कागदपत्रांची न्यायालयाने नोंद करून घेतली व इतर कागदपत्रे तपासणीसाठी न्यायालय प्रशासनाकडे पाठवली. सोमवारीच्या सुनावणीसाठी जयदेव हे न्यायालयात हजर होते. त्यांची उद्धव यांचे वकील उलटतपासणी घेणार होते. मात्र आजच्या सुनावणीला राहू शकत नाही, असे जयदेव यांनी कळवले होते. त्यामुळे ऐनवेळी त्यांची उलटतपासणी घेऊ शकत नाही, असे उद्धवे यांच्या वकीलांनी स्पष्ट केले. 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेबांचे निधन झाले. त्यांचे मृत्यूपत्र प्रमाणित करून घेण्यासाठी उद्धव यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. त्यावर जयदेव यांनी आक्षेप घेतल्याने यावर न्यायाधीश पटेल यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. हे मृत्यूपत्र तयार करताना बाळासाहेबांची प्रकृती खालावलेली होती. त्यांची दिशाभूल करून हे मृत्यूपत्र तयार करण्यात आले आहे. मृत्यूपत्र प्रामणित करून घेण्यासाठी उद्धव हे न्यायालयात अर्ज करू शकत नाही, असा दावा जयदेव यांनी केला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























