एक्स्प्लोर

शिवसेना नेते आनंदराव अडसुळांना हायकोर्टाचा दणका! ईडीच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका फेटाळली

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांना सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश.

मुंबई : सिटी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत हायकोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. तसेच याप्रकरणी त्यांना रितसर अटकपूर्व जामीनासाठी पीएमएलए कोर्टात दाद मागण्याचे निर्देश दिले आहे. ईडीनं अद्याप आपल्याला याप्रकरणी दाखल ईसीआयआरची कॉपी दिलेली नाही आणि ती देण्यास आम्ही बांधिल नाही अशी ठाम भूमिका तपास यंत्रणेच्यावतीनं एएसजी अनिल सिंह यांनी हायकोर्टात घेतली. तसेच अडसूळ हे केवळ नाटक करत असून त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचा दावा ईडीच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आला. 

लोकप्रतिनिधी राहिलेले अडसूळ जर तपासकामात अडथळा आणत असतील तर तपास कसा करणार? असा सवालही यावेळी एएसजी अनिल सिंह यांनी उपस्थित करत अडसुळांच्या याचिकेला जोरदरा विरोध केला. तर अडसुळांनी ईडीनं केवळ राजकीय दबावातून ही कारवाई सुरू केल्याचा आरोप केला. तसेच याप्रकरणात आपणच मूळ तक्रारदार होतो, तेव्हा आपल्यालाच आरोपी कसं बनवण्यात येईल? असा सवाल अडसुळांच्यावतीनं अॅड.अभिनव चंद्रचूड यांनी उपस्थित केला. मात्र, अशी अनेक प्रकरणी असतात ज्यात तक्रादारच पुढे आरोपी झालाय असं मत व्यक्त करत न्यायमूर्ती नितीन जमदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी अडसूळांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळून लावली.

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ सिटी को.ऑ. बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत सुमारे 900 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार आमदार रवी राणा यांनी केली होती. त्यानंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ईडीच्या अधिकार्‍यांनी 27 सप्टेंबरला सकाळी अडसूळ यांच्या मुंबईतील राहत्या घरी आणि कार्यालयावर धाडी टाकून चौकशी सुरू करताच अडसूळ यांची तब्येत अचानक बिघडली. आणि त्यांना गोरेगावच्या लाईफलाईन केअर रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गुरूवारी त्यांना तिथून डिस्चार्ज देत जवळच्याच एसआसव्ही रूग्णालयात हलवण्यात आलं. दरम्यान याप्रकरणीत दाखल ईसीआयआर रद्द करावा आणि अटकेपासून संरक्षण द्यावं अशी मागणी करत अडसुळांनी हायकोर्टात धाव घेतली होती.

आनंदराव अडसुळ यांच्यावतीने अ‍ॅड. अभिनव चंद्रचुड यांनी बाजू मांडताना कोर्टाला सांगितलं की, सिटी बँकेच्या 900 कोटी रूपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराशी अडसूळ यांचा थेट कसलाही संबंध नाही. केवळ राजकीय प्रतिस्पर्ध्याच्याविरोधात अडसूळ यांनी जातपडताळणी प्रमाणपत्राची तक्रार  केल्यानंच राजकीय सुडबुध्दीनं ही खोटी तक्रार करण्यात आली आहे. तसेच अडसुळ यांची प्रकृती वयोमानानुसार ढासळल्यानं त्यांना रूगणलयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, रूग्णालबाहेर ईडीचे अधिकारी सशस्त्र पाहारा देत अडसूळ बाहेर पडायचीच वाट पाहत आहेत. त्यामुळे याच धर्तीवर त्यांना ईडीच्या कारवाईपासून तूर्तास दिलासा द्यावा अशी विनंती कोर्टाकडे केली गेली. तर ईडीच्यावतीनं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी या याचिकेलाच जोरदार विरोधात केला. बँकेच्या गैरव्यवहारासंबंधी तक्रार आल्यानंतर ईडीनं आपली चौकशी सुरू केली, या चौकशीचा निवडणूक प्रकरणी अडसूळ यांनी केल्या तक्रारीशी काही संबध नाही. ईडीनं यापूर्वीही त्यांना चौकशीला हजर रहाण्याचे समन्स बजावलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या

Embed widget