एक्स्प्लोर
सफाई कामगाराचा अमेरिकेतील विद्यापीठात प्रबंध सादर
सुनील यादव हे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये एम.फिल-पीएचडीचे विद्यार्थी असून बीएमसीच्या कचरा व्यवस्थापन विभागातील कायमस्वरुपी कर्मचारी आहेत.

मुंबई : मुंबई महापालिकेतील उच्चशिक्षित सफाई कर्मचारी सुनील यादव यांचं स्वप्न अखेर साकार झालं आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या वाचनालयाला भेट देण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे. सुनील यादव यांचे आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इथेच अभ्यास केला होता.
36 वर्षीय सुनील यादव यांनी कोलंबिया विद्यापीठात 'ह्युमिलिएशन बाय बर्थ : अ केस ऑफ स्केव्हेंजिंग/क्लीनिंग इन इंडिया' या विषयावर प्रबंध सादर केला.
सुनील यादव हे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये एम.फिल-पीएचडीचे विद्यार्थी असून बीएमसीच्या कचरा व्यवस्थापन विभागातील कायमस्वरुपी कर्मचारी आहेत.
'भारतातील सफाई कर्मचाऱ्यांची स्थिती' हा त्यांच्या डेझर्टेशनचा विषय होता. तसंच 'आंबेडकांचा अखंडित वारसा' यावरील विश्लेषण मांडण्यासाठी त्यांना बोस्टनला आमंत्रित करण्यात आलं होतं.
अमेरिकेत शैक्षणिक दौरा
सुनील यादव यांनी 5 मे रोजी प्रेझेन्टेशन सादर केलं. आता ते अमेरिकेत शैक्षणिक दौऱ्यावर आहेत. "सफाई कर्मचारी म्हणून जन्मपासून सहन करावी लागणारी अवहेलना हा माझ्या अभ्यासाचा मुख्य गाभा होता. अवहेलना आणि अधोगती यामधील भिन्नता, तसंच सफाई कर्मचाऱ्यांचा होणारा तिरस्कार, ज्यामुळे त्याच्या/तिच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचते, यावर मी बोललो," असं सुनील यादव यांनी सांगितलं.
हा प्रबंध एक किंवा दोन महिन्यांच्या संशोधनातून हा प्रबंध बनवलेला नाही. तर माझ्या आयुष्यातील अनुभवांचा हा निष्कर्ष आहे, असंही यादव म्हणाले.
"जिथे सर्व देशाचे नेते येतात आणि भाषण करतात ते संयुक्त राष्ट्रांचं मुख्यालय आणि जनरल असेम्ब्ली हॉलमध्ये मी भेट दिली. हे प्रत्यक्षात घडेल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण माझ्या शिक्षणामुळे शक्य झालं," असं सुनील यादव म्हणाले.
सफाई कर्मचाऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण
मुंबईतील ग्रँट रोडचे रहिवासी असलेले श्रीरंग सुर्वे यांनी सांगितलं की, "सुनील यादव यांना ग्रँट रोडमधील रस्त्यांची सफाई करताना मी पाहिलं आहे. ते ड प्रभागात काम करतात. इथल्या लोकांच्या मनात त्यांच्याविषयी अतिशय आदर आणि सन्मानाची भावना आहे. इतकंच नाही तर भाटिया लेनमध्ये 15 ऑगस्टला त्यांच्याहस्ते ध्वजारोहणही करण्यात आलं होतं."
बोस्टनचा खडतर प्रवास
15 देशांमधील 50 स्कॉलर्सना त्यांचा प्रबंध सादर करण्यासाठी बोस्टनला आमंत्रित करण्यात आलं होतं. या 15 जणांमध्ये सुनील यादव यांचा समावेश होता. पण बोस्टनला पोहोचण्याचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. नोकरशाहीचा अडथळा पार करत ते बोस्टनला पोहोचले. बीएमसीकडून नाहरकत प्रमाणपत्र उशिरा मिळाल्याने त्यांना व्हिसा मिळवण्यासाठी अडचणी आल्या होत्या.
हालाखीच्या परिस्थितीतही शिक्षण सुरुच
त्यांचं शिक्षणही फारच खडतर पद्धतीने झालं. मास्टर डिग्री मिळवण्यासाठी त्यांना मोठी सुट्टीही मिळाली नव्हती.
गरीब कुटुंबातील असलेले सुनील यादव दहावीत नापास झाले होते. पण त्यांनी शिक्षण सुरु ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हालाखीची परिस्थिती आणि असंख्य अडचणीतही त्यांनी अभ्यास सुरु ठेवला. त्यांनी बीएमसीमध्ये सफाई कर्मचारी म्हणून नोकरी स्वीकारली.
पदवीधारी सुनील यादव
एकाच वेळी महापालिकेची नोकरी, घर आणि अभ्यास ह्या तिन्ही मोर्चांवर संर्घष करताना त्यांनी सहा पदव्या मिळवल्या. यात बी.कॉम, बीए, पत्रकारितेत बीए, डीएसडीडब्लू, एमएसडब्लू आणि एमए (ग्लोबलायझेशन अँड लेबर) च्या पदवींचा समावेश आहे. आता त्यांच्याकडे TISS कडून मिळालेली एम.फिलचीही पदवी आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
