एक्स्प्लोर

अभिनेता सोनू सूदला BMC ची नोटीस, सात दिवसांच्या आत पाऊले उचलली नाहीत तर, दिला कडक कारवाईचा इशारा

पुढील सात दिवसांच्या आत त्याने हॉटेलचे निवासी इमारतीत रूपांतर करावे अन्यथा कोणतीही सूचना न देता कारवाई केली जाईल. असा इशारा पालिकेने सोनू सूदला दिला आहे.

मुंबई : अभिनेता सोनू सूदला  (sonu sood) मुंबई महानगर पालिकेने (BMC) पुन्हा नव्याने नोटीस पाटविली आहे. सोसू सूदच्या सहा मजली इमारतीमधील हॉटेलचे निवासी इमारतीमध्ये रूपांतरीत न केल्यामुळे त्याला ही नवी नोटीस पाठविण्यात आली आहे. 
जुलै महिन्यात मुंबई महापालिकेने सोनू सूदला जुहूमधील आपल्या मालकीच्या शक्तिसागर या निवासी इमारतीत हॉटेलचे अनधिकृत बांधकाम केल्याबद्दल नोटीस पाठवली होती. त्यामध्ये त्याने या हॉटेलचे निवासी इमारतीत रूपांतर करावे आणि इमारतीमध्ये केलेले बेकायदा बांधकाम हटवावे असे सांगितले होते. त्यावर सोसू सूदने पालिकेला सांगितले होते की, हॉटेलच्या बांधकामात बदल करून घेईन. परंतु, त्याच्याकडून त्यामध्ये कोणतेही बदल न केल्याची बाब समोर आल्यानंतर पालिकेने आता त्याला नवीन नोटीस पाठविली आहे. 

पुढील सात दिवसांच्या आत त्याने हॉटेलचे निवासी इमारतीत रूपांतर करावे अन्यथा कोणतीही सूचना न देता कारवाई केली जाईल. असा इशारा पालिकेने सोनू सूदला दिला आहे. 
    
नव्याने पाठविलेल्या नोटीसीमध्ये पालिकेने म्हटले आहे की, "आपण पालिकेला पाठविलेल्या उत्तरात एक ते सहा मजल्यावरील लॉजिंग आणि बोर्डिंग उभारण्याचे काम बंद करून पालिकेने दिलेल्या आराखड्यानुसार बांधकाम केले जाईल. त्याचे कामही प्रगतीपथावर असल्याचे नमूद केले होते. परंतु, 20 ऑक्टोंबर रोजी पालिकेने केलेल्या पाहणीत बांधकामात कोणत्याही प्रकारचे बदल केले नसल्याचे पाहायला मिळाले.  

परंतु, सोनू सूद याने एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, शक्तीसागर मधील हॉटलचे निवासी इमारतीत रूपांतर केले असून त्याची माहिती महापालिकेला दिली आहे. त्याबाबच्या कागदपत्रांची पुर्तता करण्याचे काम सुरू आहे. पालिकेने दिलेल्या परवानगीनुसारच बांधकाम राहिल.    

बेकायदेशीर बांधकामाची लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केलेले सामाजिक कार्यकर्ते गणेश कुसमुलू म्हणाले की, पोलिसांनी सूद याच्या विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे. शक्तीसागरमधील इमारतीचे मुलींच्या वसतिगृहात रूपांतर झाले आहे. लोकायुक्तांच्या आदेशानंतरही महापालिका बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची कारवाई करत नाही तर फक्त नोटीसी पाठवत आहे. 
 
काय आहे प्रकरण? 
सोनूने जुहू येथील 'शक्ती सागर' या निवासी इमारतीत बेकायदेशीरपणे हॉटेल सुरू केल्याबद्दल पालिकेच्या 'के पश्चिम' विभाग कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार गेल्यावर्षी 24 ऑक्टोबरला पालिकेच्या पथकाकडून तिथली पाहणीही करण्यात आली होती. त्यावेळी तिथं मंजूर झालेल्या आराखड्यानुसार जागेचा वापर करण्यात आला नसून इमारत बांधकामात अनधिकृतपणे काही बदल केले असल्याचा ठपका सोनू सूदवर ठेवण्यात आला.  

संबंधित बातम्या 

Sonu Sood : सोनू सूदच्या अडचणी वाढणार, 20 कोटींच्या टॅक्स चोरीचा आरोप, आयकर विभागानं दिली माहिती

Sonu Sood : दोन पक्षांनी दिलेली खासदारकीची ऑफर नाकारली; टॅक्स चोरीच्या आरोपावर सोनू सूदने सोडलं मौन

 

 

महत्त्वाच्या बातम्या

मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
Tiger Shroff attack: जोराचा आवाज, मला वाटलं टायर फुटला अन् दुसऱ्याक्षणी छातीत प्रचंड वेदना व्हायला लागल्या, टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान काय म्हणाला?
जोराचा आवाज, मला वाटलं टायर फुटला अन् दुसऱ्याक्षणी छातीत प्रचंड वेदना व्हायला लागल्या, टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान काय म्हणाला?
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट
Maharashtra Live News Updates: मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आव्वाज, तर गोरेगावातील नेस्कोमधून एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार
मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आव्वाज, तर गोरेगावातील नेस्कोमधून एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
Ramdas Kadam : शिंदेसाहेब तुम्ही मला 500 कोटी दिलेत का? मनोज जरांगेंचा सवाल; तुम्हाला कोणी संपवत नाही, रामदास कदम यांचं प्रत्युत्तर
शिंदेसाहेब तुम्ही मला 500 कोटी दिलेत का? मनोज जरांगेंचा सवाल; रामदास कदम यांचं प्रत्युत्तर
जो नेता, पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल, त्यांना 2029 ला पाडायचं; जरांगे पाटलांचा नारायणगडावरुन इशारा
जो नेता, पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल, त्यांना 2029 ला पाडायचं; जरांगे पाटलांचा नारायणगडावरुन इशारा
Tiger Shroff attack: जोराचा आवाज, मला वाटलं टायर फुटला अन् दुसऱ्याक्षणी छातीत प्रचंड वेदना व्हायला लागल्या, टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान काय म्हणाला?
जोराचा आवाज, मला वाटलं टायर फुटला अन् दुसऱ्याक्षणी छातीत प्रचंड वेदना व्हायला लागल्या, टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान काय म्हणाला?
Gokul Election Result 2026: गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
Embed widget