एक्स्प्लोर

मालमत्ता कर न भरल्याने बीएमसीची कारवाई, दोन हेलिकॉप्टर जप्त

महानगरपालिकेला जकात करामधून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत होता. जकात कर रद्द होऊन त्याची जागा जीएसटी कराने घेतली आहे. जीएसटीच्या माध्यमातून पालिकेला राज्य सरकारकडून कमी प्रमाणात परतावा मिळत आहे. यामुळे पालिकेने महसूलवाढीसाठी नवीन स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी एक मालमत्ता कर आहे. मालमत्ता कर वेगाने वसुलीसाठी पालिकेने कंबर कसली आहे

मुंबई : महापालिकेच्या महसुलात दिवसेंदिवस घट होत आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने महत्वाची मालमत्ता कराच्या वसुलीसाठी जप्तीची कारवाई सुरु केली आहे. या कारवाईचा एक भाग म्हणून मालमत्ता कर न भरणाऱ्या विमान कंपनीची दोन हेलिकॉप्टर पालिकेने जप्त केली आहेत. या जप्तीचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वागत केले आहे. महापालिकेला जकात करामधून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत होता. जकात कर रद्द होऊन त्याची जागा जीएसटी कराने घेतली आहे. जीएसटीच्या माध्यमातून पालिकेला राज्य सरकारकडून कमी प्रमाणात परतावा मिळत आहे. यामुळे पालिकेने महसूलवाढीसाठी नवीन स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी एक मालमत्ता कर आहे. मालमत्ता कर वेगाने वसुलीसाठी पालिकेने कंबर कसली आहे. मात्र तरीही अद्याप 15 हजार कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. वसुलीसाठी मोहिम राबवल्याने जमा महसूलाच्या तुलनेत जवळपास 84 टक्के इतकी वाढ झाली आहे. राज्य सरकारच्या नियमानुसार 500 चौरस फुटापर्यंतच्या निवासी सदनिकांना मालमत्ता करात सूट दिल्याने 335 कोटीने महसूल कमी झाला आहे. मात्र मालमत्ता कराची कमी प्रमाणात वसुली होत असल्याने पालिकेने कर थकवणाऱ्यांवर जप्तीची कारवाई सुरु केली आहे. मेस्को एअरलाईन्स या विमान कंपनीने पालिकेच्या मालमत्ता कराची तब्बल 1 कोटी 64 लाख 83 हजार 658 इतकी रक्कम थकवली आहे. नियमानुसार पाठपुरावा करूनही विमानकंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने आज पालिकेने या कंपनीची दोन हेलिकॉप्टर जप्त केली आहेत. महापौरांकडून जप्तीचे समर्थन पालिका कर वसुलीसाठी जप्तीची कारवाई करत आहे याचा अर्थ तिजोरीला गळती लागली असा होत नाही. पालिकेचे अनेक मोठे प्रकल्प सुरु आहेत. त्यासाठी निशी लागतो. प्रकल्प पूर्ण करणे आणि नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी महसूल येणे गरजेचे आहे. मालमत्ता कर नागरिकांनी प्रामाणिकपणे भरला पाहिजे. कर भरला नाही तर सक्ती करावी लागेल. जकात कर रद्द झाल्याने पालिकेला नवीन उत्पन्नाचे स्रोत शोधावे लागत आहेत. त्या उत्पन्नांचे स्रोत मिळाले आहेत. त्यामुळे कर वसुलीसाठी कारवाई करावी लागत असल्याचे सांगत महापौर किशोरी पेडणेकर यांनी जप्तीचे समर्थन केले आहे. BMC Tax | मुंबईकरांना भविष्यात 'कचरा टॅक्स' भरावा लागणार, बीएमसीच्या अर्थसंकल्पात सूतोवाच संबंधित बातम्या :  मालमत्ता कर वसूलीसाठी पालिकेची दवंडी, पुढच्या आठवड्यापासून जप्तीची कारवाई मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, पुढील 24 तास 15 टक्के पाणीकपात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी,
शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी, "अहिल्यानगर नको अहमदनगर हवं"
Girish Mahajan : अगोदर बावनकुळे आता गिरीश महाजन, वित्त विभागाच्या विरोधानंतरही महाजनांशी संबंधित सूतगिरणीला 32 कोटींचा निधी, मंत्रिमंडळाचा निर्णय
अगोदर बावनकुळे आता गिरीश महाजन, वित्त विभागाच्या विरोधानंतरही महाजनांशी संबंधित सूतगिरणीला 32 कोटींचा निधी
Maharashtra School Uniform: धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
MHADA: म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijaykumar Deshmukh Solapur : सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुखांची डोकेदुखी वाढणार ?ABP Majha Headlines :  10 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सGirish Mahajan : गिरीश महाजनांच्या श्यामप्रसाद मुखर्जी सूतगिरणीला 32 कोटींची मदत मंजूरTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 30 सप्टेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी,
शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी, "अहिल्यानगर नको अहमदनगर हवं"
Girish Mahajan : अगोदर बावनकुळे आता गिरीश महाजन, वित्त विभागाच्या विरोधानंतरही महाजनांशी संबंधित सूतगिरणीला 32 कोटींचा निधी, मंत्रिमंडळाचा निर्णय
अगोदर बावनकुळे आता गिरीश महाजन, वित्त विभागाच्या विरोधानंतरही महाजनांशी संबंधित सूतगिरणीला 32 कोटींचा निधी
Maharashtra School Uniform: धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
MHADA: म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Pradosh Vrat 2024 : आज पितृपक्षातील सोम प्रदोष व्रत; आजच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा कोसळेल संकटांचा डोंगर
आज पितृपक्षातील सोम प्रदोष व्रत; आजच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा कोसळेल संकटांचा डोंगर
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
Ravi Pradosh Vrat 2024 : पितृपक्षाच्या दिवशी जुळून आला रवि प्रदोष व्रत; भगवान शंकराबरोबरच पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी करा 'हे' अचूक उपाय
पितृपक्षाच्या दिवशी जुळून आला रवि प्रदोष व्रत; भगवान शंकराबरोबरच पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी करा 'हे' अचूक उपाय
Embed widget