एक्स्प्लोर
Advertisement
बीएमसीच्या शाळेत साखरयुक्त वह्या, प्रोटीनयुक्त छत्र्या
मुंबई महापालिकेने वह्यांचं कंत्राट श्रीकृष्ण खांडसरी शुगर मिल्सला दिलं आहे, तर प्रोटीन फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला छत्र्या पुरवण्याचं कंत्राट देण्यात आलं आहे
मुंबई : मुंबई महापालिका... देशाच्या आर्थिक राजधानीची महापालिका, देशातील सर्वात जास्त अर्थसंकल्प असणारी महापालिका अशी हिची ओळख... पण घोटाळे आणि गलथान कारभारामुळे कायमच चर्चेत राहिलेली... आज तर महापालिकेने केलेला अजब कारभार पाहून डोक्याला मुंग्या येतील. मुंबईतल्या पालिकेच्या शाळांमधील मुलांच्या हातात आता साखरयुक्त वह्या आणि प्रोटिनयुक्त छत्र्या मिळणार आहेत.
मुंबई महापालिकेतर्फे विद्यार्थ्यांना 27 शालेय वस्तू मोफत दिल्या जातात. यापैकी वह्यांचं कंत्राट श्रीकृष्ण खांडसरी शुगर मिल्स म्हणजेच साखर उद्योगाला 22 कोटींना देण्यात आलं आहे. तर प्रोटीन फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला छत्र्या पुरवण्याचं कंत्राट नऊ कोटींना देण्यात आलं आहे.
पालिकेच्या याच अजब कारभारावरुन विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मात्र नियमानुसारच ही कंत्राटे दिल्याचा दावा महापालिकेने केला आहे. प्रतिस्पर्धी कंपनीने कोर्टाचे दरवाजे वाजवल्याने अखेर या कंत्राटाला ब्रेक लागला.
कोर्टात याचा जो निकाल येईल तो येईल, मात्र कंत्राटदार आणि पालिकेच्या हेव्यादेव्यात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होणार हे नक्की
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement