एक्स्प्लोर

ईश्वर चिठ्ठी भाजपच्या बाजूने, मुंबईत एक जागा वाढली

मुंबई : मुंबईत भाजपची एक जागा वाढली आहे. ईश्वर चिठ्ठीमुळे भाजपचे अतुल शाह विजयी झाले आहेत. यामुळे मुंबईत भाजपला एकूण 82 जागांवर विजय मिळाला आहे. आता शिवसेनेला भाजपपेक्षा केवळ दोनच जागा जास्त मिळाल्या आहेत. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 220 मध्ये शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर आणि भाजपचे अतुल शाह यांना समान मतं मिळाली होती. त्यानंतर फेरमतमोजणी घेण्यात आली. सुरुवातीपासून आघाडीवर असणाऱ्या शिवसेनेला शेवटच्या काही राऊंडमध्ये फटका बसला आणि निकाल पलटला. सुरेंद्र बागलकर आणि अतुल शाह यांच्यात टाय झाला तर दोन पर्याय समोर होते. त्यापैकी पहिला पर्याय लॉटरीचा आणि दुसरा उमेदवार कोर्टात जाऊ शकतात. अखेर ईश्वर चिठ्ठीचा पर्याय निवडण्यात आला. ही ईश्वर चिठ्ठी भाजपच्या अतुल शाह यांच्या बाजूने आली. त्यामुळे शाह यांना विजयी घोषित करण्यात आलं. वॉर्ड क्रमांक २२० मध्ये झालेली लढत ही अटीतटीची आणि 'तिरंगी' होती. शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर आणि भाजपचे अतुल शहा यांच्या टाय व्यतिरिक्त काँग्रेसच्या नरेंद्र शेठ यांनीही कडवी लढत दिली. राऊंड १ शिवसेना - ८१५ भाजप- ४७९ काँग्रेस -१८१ राउंड २ शिवसेना ७८४ भाजप ५३९ काँग्रेस १५० राऊंड ३ शिवसेना ८९५ भाजप ६३० काँग्रेस १७८ राऊंड ४ शिवसेना ८६२ भाजप ६१२ काँग्रेस २३७ राऊंड ५ शिवसेना ४९९ भाजप ३०५ काँग्रेस ४२४ राऊंड ६- शिवसेना १६५ भाजप ५७ काँग्रेस ७०० राऊंड ७ शिवसेना १७८ भाजप ११० काँग्रेस ६०७ राऊंड ८ सेना १८४ भाजप ८४ काँग्रेस ६४० राऊंड ९ शिवसेना २०२ भाजप ७८ काँग्रेस ८०९ राऊंड १० शिवसेना ६६० भाजप ६७१ काँग्रेस ४२४ राऊंड ११ शिवसेना ३१८ भाजप ८५० काँग्रेस ४३१ राऊंड १२ शिवसेना २९१ भाजप ८९८ काँग्रेस ३८० राऊंड १३ शिवसेना ९३ भाजप ६३३ काँग्रेस १९७ एकूण- ५९४६- शिवसेना, सुरेंद्र बागलकर ५९४६- भाजप, अतुल शहा ५३५८-  काँग्रेस नरेश शेठ
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान

काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी

व्हिडीओ

Seher Shaikh MIM : मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू, विरोधकांच्या अहंकाराला मातीमोल केलंय- सहर शेख
Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा

NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा

निवडणूक आयोगाच्या कार्यालयातच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात

Embed widget