(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वॉरंटाईन करणार, दर 48 तासांनी होणार कोरोना टेस्ट; मुंबई महापालिकेचा निर्णय
Omicron Variant : ओमिक्रॉन व्हेरियंटच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
मुंबई : आता कुठे राज्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याचं दिसत असताना ओमिक्रॉन (Omicron Variant) या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. या नव्या व्हेरियंटसोबत लढण्यासाठी आता मुंबई महापालिका सरसावली असून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या आज झालेल्या महत्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना आता 14 दिवस क्वॉरंटाईन केलं जाणार असून त्यांची दर 48 तासांनी कोरोना टेस्ट केली जाणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर मुंबई विमानतळावर बंदी घालण्याची मागणी आज केंद्र सरकारकडे राज्याने केली आहे.
विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जाणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने गेल्या 14 दिवसांत आफ्रिकेतील कोणत्या देशाचा दौरा केला असेल तर त्याचीही तपासणी केली जाणार आहे. याचप्रमाणे मुंबईतील जंबो कोव्हिज सेंटरचे फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उद्या संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील कोरोना परिस्थिती आणि नव्या व्हेरियंट बाबत करण्यात आलेल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे, टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूमुळे जगभरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर चिंता वाढलीय. कारण हा नविन विषाणू डेल्टाप्लस पेक्षा ही भयंकर असल्याची चिंता तज्ञांनी व्यक्त केलीय. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर मुंबई विमानतळावर बंदी घालण्याची मागणी आज केंद्र सरकारकडे राज्याने केली आहे. तर आज जाहीर केलेल्या नियमावलीत नविन विषाणूच्या पाश्र्वभूमीवर लसीकरणावर भर देण्यात आला असून दंडात ही मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
- ओमिक्रॉन व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील होणार; मुंबई महापालिकेचा निर्णय
- Coronavirus New Variant Omicron : धोक्याची घंटा! दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह
- रुमाल म्हणजे मास्क नाही, रुमालाचा वापर मास्क म्हणून केल्यास 500 रुपयांचा दंड लागणार; राज्य सरकारची नवी नियमावली