एक्स्प्लोर

पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने मुंबईत 800 कोटींचा भूखंड घोटाळा

वर्षभरात मुंबई महानगरपालिकेत भूखंडांचे अनेक घोटाळे गाजले असतानाच वर्षाच्या शेवटच्या दिवशी अजून एक घोटाळा समोर आला आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने लोअर परळ येथे तब्बल 800 कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा झाला असल्याचा आरोप सुधार समितीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला आहे.

मुंबई : वर्षभरात मुंबई महानगरपालिकेत भूखंडांचे अनेक घोटाळे गाजले असतानाच वर्षाच्या शेवटच्या दिवशी अजून एक घोटाळा समोर आला आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने लोअर परळ येथे तब्बल 800 कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा झाला असल्याचा आरोप सुधार समितीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला आहे. याप्रकरणी अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांनी दिला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये दहिसर, जोगेश्वरी, कुर्ला येथील कोट्यवधींचे भूखंड घोटाळे गाजले असतानाच आता लोअर परळ येथे 800 ते एक हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक अश्रफ आझमी यांनी सुधार समितीत केला. मुंबई महापालिकेच्या भूखंडाचा वापर करून त्यावर निकृष्ट दर्जाचे संक्रमण शिबिर संबंधित बिल्डरने उभारले. कराराप्रमाणे हे बांधकाम 50 वर्ष टिकायला हवे, परंतु ते 10 वर्षातच निकृष्ट ठरल्य़ाने ते पाडावे लागले. या प्रकरणी बिल्डरला दोषी ठरवून 70 कोटी रुपयांचा दंड पालिका प्रशासनाने आकारला. परंतु बिल्डरने दंड भरण्यास नकार देत नव्याने संक्रमण शिबिर बांधून देण्याची तयारी दर्शवली. बिल्डरने संक्रमण शिबिरातील सदनिका 225 चौ. फुटाच्या आाकाराच्या सदनिका बांधल्या. त्या सदनिकांचे दोन भाग केले व त्यामध्ये दोन - दोन कुटुंबे वसवली. या सर्व प्रकरणात बिल्डरला 800 ते 1000 कोटी रुपयांचा फायदा झाला. या सर्व प्रकारात पालिका अधिकाऱ्यांचे संगनमत होऊन हा घोटाळा झाला असल्याचा खळबळजनक आरोप आझमी यांनी सुधार समितीत केला. त्यामुळे या घोटाळ्याची ईडी व अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नगरसेवकांनी लावून धरली. भूखंड बेघरांसाठी होता आरक्षित लोअर परळ, जी.के. मार्ग येथे पालिकेच्या मालकीचा भूभाग क्र. 437 हा भूखंड आहे. या भूखंडाचे क्षेत्रफळ 7094.54 चौरस मीटर एवढे आहे. भूखंडाची किंमत कोट्यवधी रुपये आहे. हा भूखंड 1991 च्या विकास आराखड्यात बेघरांसाठी घरे बांधण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावासाचा इशारा, मुंबईसह ठाण्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन 
वादळी वाऱ्यासह मुसळधार पावासाचा इशारा, मुंबईसह ठाण्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन 
धक्कादायक! कचरा फेकण्यासाठी गेला, पाय घसरुन नदीत पडला, भिवंडीत कामवारी नदीत बुडून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
धक्कादायक! कचरा फेकण्यासाठी गेला, पाय घसरुन नदीत पडला, भिवंडीत कामवारी नदीत बुडून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
मुंबईत पावसाचा हाहाकार! वादळी वाऱ्यामुळं 250 हून अधिक झाडे उन्मळून पडली, दोन जणांचा मृत्यू
मुंबईत पावसाचा हाहाकार! वादळी वाऱ्यामुळं 250 हून अधिक झाडे उन्मळून पडली, दोन जणांचा मृत्यू
Uddhav Thackeray: राम मंदिरातील दान चोरी अयोध्येची झांकी असेल तर काशी मथुरा किती लुटतील? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हिंदूंनी जागं राहावं, कोणी मंदिर लुटत असेल तर अब हिंदू माफ नही करेगा, उद्धव ठाकरेंचा इशारा

व्हिडीओ

Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget