एक्स्प्लोर
पालिका अधिकाऱ्यावर दबाव, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांवर आरोप
मुंबई : गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता पालिका अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याप्रकरणी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारवाई थांबवण्यासाठी मेहता यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे.
अशोककुमार शामजी तवाडिया या पालिका अभियंत्याच्या अहवालात मंत्रिमहोदयांचा उल्लेख आहे. कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांवर प्रकाश मेहतांनी दबाव टाकल्याचा आरोप केला जात आहे.
मुंबईतील पाईपलाईन लगतच्या वाढत्या झोपड्यांविरोधात हायकोर्टात याचिका केली आहे. सामाजिक कार्यकर्ता भगवानजी रयानी यांनी ही याचिका दाखल केली आहे. एन वॉर्डात वारंवार तक्रार करुनही कारवाई होत नसल्याचं याचिकाकर्त्याने म्हटलं आहे.
टिळक नगर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला स्टेशन डायरीसह हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हायकोर्टाने राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी महाधिवक्त्यांना हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
संबंधित बातम्या :
'हो... माझा संयम सुटला,' अखेर प्रकाश मेहतांकडून माफीनामा
VIDEO: बेजबाबदार प्रकाश मेहतांची उद्धट उत्तरं, पत्रकाराला धमकी
मंत्री प्रकाश मेहतांचा राजीनामा घ्या, नाहीतर हकालपट्टी करा: काँग्रेस
‘फालतू प्रश्न विचारणाऱ्यांना मी उत्तर देत नाही?’ महाड प्रश्नावर प्रकाश मेहतांचं उद्दाम उत्तर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement