एक्स्प्लोर

अवैध होर्डिंगवर कारवाईसाठी गेलेल्या मनपा अधिकाऱ्यांना मारहाण

अंधेरी पूर्वमधील भाजप नगरसेवक मुरजी पटेल व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर होर्डिंग्ज लावून हायकोर्टाच्या आदेशाचा केवळ अवमानच केला नाही, तर यावर कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाणही केली.

मुंबई : राज्यभरातील बेकायदेशीर होर्डिंग्जविरोधात सुस्वराज्य फाऊंडेशनच्यावतीनं दाखल जनहित याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीत मुंबईतील एका नगरसेवकाच्यावतीनं करण्यात आलेला मुजोरपणा हायकोर्टाच्यासमोर आला. अंधेरी पूर्वमधील भाजप नगरसेवक मुरजी पटेल व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर होर्डिंग्ज लावून हायकोर्टाच्या आदेशाचा केवळ अवमानच केला नाही, तर यावर कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाणही केली. ही बाब शुक्रवारच्या सुनावणीत पालिकेनं हायकोर्टाच्या निर्दशनास आणून दिली. याची अत्यंत गंभीर दखल घेतली हायकोर्टानं या नगरसेवकाविरुद्ध सोमवारी न्यायालय अवमान केल्याबद्दल ‘कारणे दाखवा’ नोटीस काढणार असल्याचे स्पष्ट संकेतही दिले. ‘भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल व केसरबेन मुरजी पटेल यांच्या जीवनज्योती फाऊंडेशनतर्फे पालिका मैदानाबाहेर व फुटपाथवर बेकायदा होर्डिंग व बॅनर लावल्याची तक्रार पालिकेच्या ३० जानेवारी पालिकेच्या वेबसाईटमार्फत मिळाली होती. त्यानुसार, खातरजमा केल्यानंतर के वॉर्डातील लायसन्स इन्स्पेक्टर उत्तम सरवदे हे आपल्या सहकाऱ्यांसह कारवाईस गेले. पालिका अधिकारी हे होर्डिंग्ज काढत असताना पटेल यांचे समर्थक व भाजपचे कार्यकर्ते राजू सरोज, सुनील चिले, रोशन शेख, नरेश शेलार, महेश शिंदे, प्रकाश मुसळे, विशाल निचिते यांनी त्यांना प्रचंड शिवीगाळ करत पालिका कर्मचा-यांना मारहाणही केली’, असे महापालिकेने अवमान याचिकेद्वारे हायकोर्टाच्या निदर्शनास आणले. तसेच यासंदर्भातील फोटोही पुराव्यादाखल सादर केले आहेत. पालिकेने यालंदर्भात फौजदारी खटला भरला असून त्यात आरोपींविरुद्ध आरोपपत्रही दाखल होईल. त्यामुळे याप्रकरणात दुहेरी कारवाई होणे योग्य नाही, असे म्हणणे प्रतिवादींच्या वकिलांनी मांडले. या भूमिकेबद्दल हायकोर्टाने तीव्र ताशेरे ओढले. "वास्तविक, सर्व कार्यकर्त्यांना असे बेकायदा कृत्य न करण्याबाबत आणि नागरिकांमध्येही न्यायालयाच्या आदेशांबाबत जनजागृती करण्याचे प्रयत्न लोकप्रतिनीधी या नात्यानं तुमच्याकडून होणं अपेक्षित होते. त्याउलट पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रकार तुम्ही केला. हे अत्यंत गंभीर आहे. तुमची कृती केवळ फौजदारी स्वरुपातीलनसून न्यायालय अवमानाचीही आहे", असे निरीक्षण नोंदवून खंडपीठाने या सर्वांविरुद्ध न्यायालय अवमानाबद्दल ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे स्पष्ट संकेत दिलेत. दरम्यान, यावेळी पुण्यातील शनिवारवाडा परिसरात होर्डिंग लावण्याचा लोखंडी टॉवर कोसळून घडलेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाल्याची माहितीही वकील उदय वारुंजीकर यांनी हायकोर्टाला दिली. त्याची दखल घेत याचा तपशील सोमवारी सादर करण्याचे तोंडी निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget