(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Iqbal Singh Chahal: इक्बालसिंह चहल ईडीची चौकशी संपली, कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडी चौकशी
Iqbal Singh Chahal: बीएमसी आयुक्त इक्बालसिंह चहल यांची आजची ईडी चौकशी संपली आहे. ईडीनं चहल यांची चार तास चौकशी केली.
Iqbal Singh Chahal: बीएमसी आयुक्त इक्बालसिंह चहल यांची आजची ईडी चौकशी संपली आहे. कोरोना काळात कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याच्या आरोपावर ईडीकडून इक्बालसिंह चहल यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती, याबाबत चहल यांना ईडीनं नोटीस पाठवली होती. त्यासंदर्भात जबाब नोंदवण्यासाठी इक्बालसिंह चहल ईडी कार्यलयात हजर राहिले होते. चौकशी झाल्यानंतर इक्बालसिंह चहल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला...
कोविड आल्यानंतर तीन हजार 700 बेड होते. मुंबईची लोकसख्या एक कोटी 40 लाख आहे. त्यामुळे बेडची संख्या अतिशय कमी होती. लाखो रुग्ण येणार आहेत, असा अंदाज होता. तो अंदाज खरा ठरला.. मुंबईमध्ये 11 लाख जणांना कोरोना झाला. त्यानंतर ओपन ग्राऊंडमध्ये जम्बो कोडिव सेंटर करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. त्यानुसार, बीएमसीनं शासनाला एक निवेदन केलं, त्यामध्ये कोरोनाविरोधात लढण्यात बीएमसी खूप व्यस्त आहे. त्यानुसार दहिसर, बीकेसी, सायन, मलाड, कांजूरमार्ग यासह काही कोविड सेंटर सरकार व्यतिरिक्त बांधण्यात आली. बीकेसीमधील कोविड सेंटर एमएमआरडीएनं बांधला तर कांजुरमार्ग येथील सिडकोनं बांधला... मुंबई मेट्रो रेलनेही बांधकाम केलं. बांधकाम झाल्यानंतर यामध्ये बीएमसी कन्स्ट्रक्शन कॉस्ट शून्य आला. यामध्ये बीएमसीचं योगदान शून्य होतं. जेव्हा हे टप्प्या टप्प्यानं जम्बो हॉस्पिटल तयार झाले... दहा पैकी एका एका कोविड हॉस्पिटल संदर्भात 2022 मध्ये तक्रार करण्यात आली होती. त्यासंदर्भात आज चौकशी झाली... चौकशीमध्ये सहकार्य केलं आहे, असे चहल म्हणाले...
जून 2020 मध्ये कोविड आल्यानंतर उपाययोजना केली नसती तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. त्यानंतर राज्य सरकारच्या सूचनेनंतर आम्ही मोकळ्या मैदानात जम्बो कोविड सेंटर सुरू केले. विविध ठिकाणच्या मोकळ्या जागा घेतल्या, त्याचे काम आम्ही संबधित रुग्णालयालाही दिले. मात्र तिथे आम्हाला मनुष्यबळाची कमतरता जाणवली. त्यावेळी कोविड रुग्णालयात जिथे सर्व आमचं आहे, तिथे आम्ही कोटेशन घेऊन चार पार्टींना आऊट सोर्सिंगचं काम दिलं. यामुळे लाखो लोगांना वेळीच उपचार मिळाले. त्यांचे प्राण वाचवले. या चार पार्टीचं काम फक्त आम्हाला डॉक्टर आणि कर्मचारी पुरवण्याचं होतं. त्यानुसार दिवसाचे त्यांना पैसे देण्याचं ठवण्यात आलं होतं. मात्र यात काहींनी बनावट कागदपत्र सादर केल्याचे निदर्शनास आल्यानंतर आम्ही पोलिसांना पत्र लिहून त्याची शहानिशा करावी असे कळवले होतं. तसेच पालिकेतर्फे आम्ही सर्व सहकार्य करण्याचे आता ईडीला कळवले आहे. पून्हा चौकशीला बोलावल्यास पून्हा सहकार्य करू, असे चहल म्हणाले.
या प्रकरणात आरोप काय आहेत ?
कोरोनामध्ये मुंबईत जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यासाठी विविध कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले, यामध्ये लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्याचे कंत्राट प्राप्त झालं...
शिवाय कंत्राट प्राप्त करून घेण्यासाठी या कंपनीने बनावट कागदपत्र बीएमसीकडे सादर केले असल्याचा आरोप आहे.
ही कंपनी संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि त्यांच्या भागीदाराच्या नावावर आहे...कंपनीची स्थापना जून 2020 मध्ये झाली डॉक्टर हेमंत गुप्ता, सुजित पाटकर ,संजय शहा ,राजू साळुंखे हे भागीदार आहेत.
या कंपनीकडे पुरेसा स्टाफ नाही तसेच एमडी डॉक्टर साहेब ज्युनिअर इनटर्नशिप डॉक्टर नेमल्याचे व कंत्राट मधील अटी व शर्तीचा भंग केल्याचा निदर्शनास आलं.
सदर कंपनी नवीन असून तिला अनुभव नसतानाही कंत्राट दिली असेल निदर्शनास आलं त्यानंतर पुणे महानगर प्रदेश प्राधिकरणाने कंपनीला टर्मिनेट करून 25 लाख रक्कम जप्त केली.
त्यानंतर या कंपनीला कुठल्याही प्रकारचे कंत्राट न देण्याचे आदेश असताना सुद्धा मुंबई महापालिकेने या कंपनीला कंत्राट दिले अशी माहिती मिळाली.
त्यामुळे या सगळ्या कोविड सेंटर कंत्राटामध्ये 100 कोटी रुपये घोटाळा झाल्याचं आरोप करण्यात आले.