एक्स्प्लोर
Advertisement
मी खड्ड्यांसाठी जबाबदार, मनसेकडून मुख्य अभियंत्यांच्या हाती फलक
मुंबई : मनसे नगरसेवकांनी रस्ते विभागाचे मुख्य अभियंत्याची बदनामी केल्याप्रकरणी वरळीत महापालिकेच्या अभियंत्यांचे धरणं आंदोलन सुरु केलं आहे. वरळी हब इथे आंदोलन करत आहे.
रस्ते विभागाचे मुख्य अभियंते संजय दराडे यांच्या हाती, "मी मुख्य अभियंता (रस्ते), या खड्ड्यांसाठी जबाबदार आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी", असं लिहिलेला फलक मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी दिली.
दराडे यांना रस्त्यात उभं करुन मनसेने त्यांचा अपमान केल्याचा आरोप करत पालिका अभियंत्यांनी धरणं आंदोलन सुरु केलं आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांना केवळ अभियंत्यांनाच जबाबदार धरुन वेठीस धरले जाते, यामुळे अभियंत्यांमध्ये नाराजी आहे. इतकंच नाही तर नाराज अभियंत्यांनी महापालिका आयुक्तांकडे राजीनामे देण्याची तयारी दर्शवली आहे.
संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटक केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा अभियंता संघटनेने दिला आहे. तसंच राजकीय स्वार्थासाठी अधिकाऱ्यांचा सुरु असलेला छळ खपवून घेणार नसल्याचं अभियंत्यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement