एक्स्प्लोर

मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर, पक्ष मेळाव्यात निर्धार

मुंबई: फेब्रुवारी 2017मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा राजकीय आखाडा रंगू लागला आहे. मुंबई महापालिकेवर सुमारे दोन दशकांपासून शिवसेनेचा भगवा फडकतो आहे. 1995 नंतर भाजपने युती करून सत्तेत सहभागी झाले. पण 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील भाजपला मिळावलेल्या वर्चस्वामुळे मुंबई महानगरपालिकेतील महापौरपदाची खुर्ची खुणावते आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळवून महापौरपदी भाजपचाच उमेदवार बसवण्याचा निर्धार आज झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.   आजच्या भाजपच्या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, सार्वजानिक बांधकाममंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी, पुनम महाजन यांच्यासह मुंबईतील भाजपचे सर्व आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.   या बैठकीवेळी पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी अशिष शेलार यांची पुन्हा निवड करण्यात आली. तसेच महापालिका निवडणुकीसाठी 114+ चे ध्येय समोर ठेऊन स्वबळावरच निवडणूक लढण्याचा निर्धार पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.     अशिष शेलार यांच्या फेरनियुक्तीनंतर बोलताना त्यांनीही महापालिकेत शतप्रतिशत भाजपचा नारा दिला. ते म्हणाले की, ''2016-18 या कार्यकाळासाठी पक्षाने माझीच फेर नियुक्ती का केली हे सांगण्याची गरज नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जे चुकले ते शतप्रतिशत भाजपचे स्वप्न आगामी महापालिका निवडणुकीत साकार करणारच,'' असा निर्धार व्यक्त केला.   गेल्या काही दिवसांपासून सेना- भाजपतील वादाने अक्षरश: टोक गाठले होते. प्रकाश मेहतांच्या सिंहावरून सुरू झालेल्या या कुरबुरी थेट निजामा, सालार जंग, कासिम रिझवी, आसरानीपर्यंत येऊन थडकल्या. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यातही शिवसैनिकांनी स्वबळावर निवडणुक लढण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले होते. यावेळीच या निवडणुकीत सेना-भाजपसोबत युती करण्यासाठी इच्छूक नसल्याचे स्पष्ट झाले होते. पण, आज झालेल्या भाजपच्या मेळाव्यातही भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केल्याने ही निवडणुक दोन्ही पक्ष स्वतंत्रच लढतील हे स्पष्ट झाले आहे.   सध्या महापालिके शिवसेना- भाजपची सत्ता असून शिवसेनेचे 75, तर भाजपचे 31 नगरसेवक आहेत. या निवडणुकीत भाजपने 114+ चा नारा देऊन सेनेला एकटे पाडले आहे. काल झालेल्या केंद्रातील मंत्रीमंडळ विस्तारातही भाजपने दलित मतांवर डोळा ठेऊन रामदास आठवलेंना मंत्रिमंडळात सामावून घेतले. त्यामुळे आता भाजपने महापालिकेसाठी व्यूहरचना केली असल्याचे दिसते.

महत्त्वाच्या बातम्या

समुद्रात अडकलेल्या जहाजावर चोरी करायला गेले, चार जण जीव गमावून बसले, नेमकं काय घडलं?
समुद्रात अडकलेल्या जहाजावर चोरी करायला गेले, चार जण जीव गमावून बसले, नेमकं काय घडलं?
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
आंदोलनामध्ये जोमाने उतरा, निवडणूक आयुक्तांच्या विरोधातील राग रस्त्यावर दिसू द्या, उद्धव ठाकरेंच्या सूचना
आंदोलनामध्ये जोमाने उतरा, निवडणूक आयुक्तांच्या विरोधातील राग रस्त्यावर दिसू द्या, उद्धव ठाकरेंच्या सूचना
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?

व्हिडीओ

Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath Crime : अंबरनाथमध्ये नाट्यगृहात पालिकेची सभा, बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये शस्त्र सापडली,वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं खळबळ
अंबरनाथमध्ये नाट्यगृहात पालिकेची सभा बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये शस्त्र सापडली,वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं खळबळ
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
Aadhaar Card :  मोठी बातमी, दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय   
दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
Video: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात संजय राऊतांनी ठाण्यात जाऊन ठणकावलं; दोघांचं नाव घ्यावंच लागेल, कुणालाही सोडायचं नाही
Video: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात संजय राऊतांनी ठाण्यात जाऊन ठणकावलं; दोघांचं नाव घ्यावंच लागेल, कुणालाही सोडायचं नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2026 | बुधवार
Share Market : सप्टेंबरच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण सुरुच, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget