Kishori Pednekar : किशोरी पेडणेकरांना अटकेपासून दिलासा कायम, BMC डेड बॉडीबॅग खरेदी कथित घोटाळा प्रकरण
BMC Dead Body Bag Scam : कोरोना काळातील बॉडीबॅग खरेदी कथित घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे.
Kishori Pednekar News Update : माजी महापौर किशोरी पेडणेकरांना (Kishori Pednekar) यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिलासा दिला आहे. पेडणेकरांना हायकोर्टाचा अटकेपासून (Bombay High Court) मिळालेला दिलासा तूर्तास कायम आहे. कोरोना काळातील बॉडीबॅग खरेदी कथित घोटाळा (Covid-19 Body Bag Scam) प्रकरणी किशोरी पेडणेकर यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे.
किशोरी पेडणेकरांना हायकोर्टाचा दिलासा कायम
कथित बॉडी बॅग खरेदी प्रकरणात ईडीने मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 22 फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश, मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. नियमित कोर्ट कामकाजासाठी उपलब्ध नसल्यानं दिलेला अंतरिम दिलासा मुंबई हायकोर्टाकडून कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान, किशोरी पेडणेकर यांना अटक झाल्यास 30 हजारांच्या जामीनावर तात्काळ सुटका करण्याचे हायकोर्टाकचे निर्देश कायम ठेवण्यात आले आहेत.
कोरोना काळातील बॉडीबॅग खरेदी घोटाळा प्रकरण
— Amey Rane (@ameyrane85) February 16, 2024
माजी महापौर किशोरी पेडणेकरांना हायकोर्टाचा अटकेपासून दिलासा 22 फेब्रुवारीपर्यंत कायम
नियमित कोर्ट कामकाजासाठी उपलब्ध नसल्यानं दिलेला अंतरिम दिलासा कायम
दरम्यान अटक झाल्यास 30 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे हायकोर्टाचे निर्देश कायम pic.twitter.com/10GshmaAOZ
काय आहे प्रकरण?
डॉ. हरिदास राठोड यांना माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी व्हीआयपीएलकडून 1200 डेड बॉडी बॅग खरेदी करण्यासाठी 16 मे ते 7 जून 2020 या कालावधीत प्रत्येकी 6 हजार 719 रुपयांना विकत घेण्यास भाग पाडल्याचा आरोप तपास यंत्रणेनं केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. साल 2020 मध्ये किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांच्या आदेशानेच पालिका अधिकाऱ्यांनी या डेड बॉडी बॅगची खरेदी केल्याचा उल्लेख आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरमध्ये केला आहे.
किशोरी पेडणेकरांवर अटकेची टांगती तलवार
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविड काळात वाढीव दराने डेड बॉडी बॅग खरेदी केल्याचा आरोप आहे. या मुंबई पालिका डेड बॉडी बॅग कथित घोटाळा प्रकरणाचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. वाढीव दराने डेड बॉडी बॅग खरेदी केल्यानं या व्यवहारातील टक्केवारी आरोपींना मिळाल्याचा संशय आहे.
ईडी चौकशीलाही सामोरं जावं लागलं
याप्रकरणी पेडणेकर यांच्यासह वेदांत इनोटेकचे (व्हीआयपीएल) संचालक आणि कंत्राटदार तसेच वरिष्ठ अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) यांच्यासह पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आरोपी बनवण्यात आलं आहे. या कथित बीएमसी बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांना ईडी चौकशीलाही सामोरं जावं लागलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :