एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Covid Center Scam: दंड ठोठावलेल्या कंत्राटदाराला ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं 300 कोटींचं कंत्राट; कोविड घोटाळ्यातील चौकशीतील धक्कादायक बाब

BMC Covid Center Scam: भायखळा प्राणीसंग्रहालय पेंग्विन एन्क्लोजर घोटाळ्यात दंड ठोठावलेल्या कंत्राटदारालाच पालिकेने 300 कोटींच्या ऑक्सिजन प्लांट उभारणीचं कंत्राट दिलं होतं.

BMC Covid Center Scam:  कथित कोविड सेंटर घोटाळा (Covid Scam) प्रकरणात तपास करत असलेल्या सक्तवसुली संचालनायाच्या (ईडी) पथकाला तपासात काही नवीन बाबी आढळून आल्या आहेत. भायखळा प्राणीसंग्रहालय पेंग्विन एन्क्लोजर घोटाळ्यासाठी दंड ठोठावण्यात आलेल्या कंत्राटदारालाच कोविड दरम्यान ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी 300 कोटी रुपये देण्यात आले होते, अशी माहिती आता समोर आली आहे. कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करत असलेल्या ईडीच्या सूत्रांनी ही माहिती दिली.

बुधवारी (5 जुलै) ईडीने मुंबई, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थानमधील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी संबंधित सुमारे 10 कंत्राटदारांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. ईडीने ज्या कंत्राटदारांवर छापे टाकले, त्यात घाटकोपर येथील कंत्राटदार रोमीन छेडा यांचा समावेश आहे. छेडा यांना कोरोना काळात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं, त्यांनी मुंबई पालिकेकडून (BMC) मोठ्या प्रमाणात पैसे मिळाल्याचा संशय आहे.

महापालिकेतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) बुधवारी छापेमारी करण्यात आलेल्या सरकारी कंत्राटदारांची नावं समोर आली आहेत. रोमीन छेडा, रोमेल ग्रुपचे बिल्डर ज्यूड रोमेल आणि डॉमनिक रोमेल अशी कंत्राटदारांची नावं आहेत. मनपाच्या कोविड जम्बो सेंटर घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित चौकशीचा भाग म्हणून या कंत्राटदारांच्या घरावर आणि कार्यालयांवर ईडीकडून बुधवारी छापेमारी करण्यात आली होती, त्याचबरोबर उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान अशा एकूण 10 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. छापे टाकण्यात आलेली ठिकाणं ही कोविडच्या कालावधीत मुंबई महानगरपालिकेला सेवा पुरवणाऱ्या कंत्राटदारांशी संबंधित होती. छापेमारी दरम्यान आरोप असलेल्या कंत्राटदारांकडून कोट्यवधींची रोख रक्कम आणि काही कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत.

ज्या कंत्राटदारांवर ईडीने छापे टाकले, त्यात घाटकोपर येथील रोमीन छेडा या कंत्राटदाराचा समावेश आहे, ज्यांना ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं. त्यांना मनपाकडून मोठ्या प्रमाणात पैसे मिळाल्याचा संशय आहे. छेडा याने यूपी-स्थित हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत कंत्राटाचं काम करून घेतल्याचा संशय आहे आणि कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी त्यांना सुमारे 300 कोटी रुपये दिले गेले होते, असं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं. निकृष्ट उपकरणं पुरवल्याचा आरोपही त्यांच्यावर होता.या प्रकरणाचा तपास सुरू असताना कंत्राटदाराच्या फायलींवर मनपा अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली आणि त्याला भरघोस मोबदला दिला गेला, असंही सूत्रांनी सांगितलं. रोमीन छेडा हा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचा अधिकृत प्रतिनिधी आहे, जी कंपनी यूपीतील अलाहाबाद येथे आहे. कोविड घोटाळ्याआधी भायखळा प्राणीसंग्रहालय पेंग्विन एन्क्लोजर घोटाळ्यात या संस्थेला दंड ठोठावण्यात आला होता.

हेही वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagraj Manjule Summons : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना गंभीर प्रकरणात पुणे कोर्टाकडून समन्स; नेमकं प्रकरण काय?ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 26 November 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्स-100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर Superfast News ABPमाझाSanjay Raut Mumbai : रश्मी शुक्ला, अदानी ते महायुती सरकार;संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Ind vs Aus 2nd Test : कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
Maharashtra Wether Updates : राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
PAN 2.0 Project : मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?
मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?
Nagraj Manjule : खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
Embed widget