मुंबईत साचलेलं 14 हजार दशलक्ष लीटर पाणी समुद्रात सोडलं, BMC च्या दाव्यानंतर ट्विटराईट्सचा संताप
मुंबई परिसरात साचलेलं 14 हजार दशलक्ष लीटरपेक्षा अधिक पाणी महापालिकेच्या सहा पंम्पिंग स्टेशन्समधून समुद्रात सोडल्याची माहिती बीएमसीने दिली. त्यानंतर या पाण्याचं संवर्धन न केल्याबद्दल ट्विटराईट्सनी महापालिकेलाच धारेवर धरलं
दरम्यान, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे पर्जन्य जलाचा साठा केला जात नसल्याची झोड नेटिझन्सनी ट्विटरवर उठवली आहे. पाण्याचा निचरा समुद्रात करण्याऐवजी हे पाणी साठवलं असतं, तर त्याचा भविष्यात लाभच झाला असता, असं मत ट्विटरवर व्यक्त केलं जात आहे. एकीकडे, मुंबईची लोकसंख्या वाढत असताना त्या प्रमाणात जलसाठे वाढलेले नाहीत. त्यामुळे उपलब्ध स्रोतांवरील ताण आधीच वाढत असताना, पाणी फेकून देणं चुकीचं असल्याची ओरड केली जात आहे.6 pumping stations of MCGM pumped out more than 14000 Million litres of water and discharged it into the sea which is more than combined capacity of TULSI and VIHAR Lake. #MumbaiRainsLiveUpdate #MumbaiRainsUpdates #MCGMUpdates pic.twitter.com/mxl5EnRpkY
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 2, 2019
In times of technological advancement, we still have no mechanism to conserve rain water and use it fruitfully. Tells a lot about the political will.
— nimish nadkarni (@nimish161) July 2, 2019
Why you have discharged in sea. Why don't you have water collection system in place. . Modi goverment running a drive to preserve water from 1july to 30 th nov. This is the way to pursue with it. Shame
— Agastya Mirza (@PKM_agastya) July 2, 2019
This should be done before monsoon. Precaution is better than cure is not applicable for BMC. So many area your staff were not responding. It's Pathetic. This is Great example of negligence. Shame on BMC @bmcmumbai @ANI @abpnewstv
— VINAYAKK V (@vinayakk_v) July 2, 2019
मुंबईत पावसाने उघडीप घेतलेली असली तरी संध्याकाळ होऊनही रेल्वे वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत आहे. मुंबईकरांनी घरीच बसणं पसंत केल्यामुळे रेल्वे स्थानकांवर तुरळक गर्दी आहे. मात्र मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.@AUThackeray Why don't u make underground wells n tanks in the areas of Mumbai which c so much flooding n ensure this water is conserved for future use
— manisha nanavaty (@NanavatyManisha) July 2, 2019