एक्स्प्लोर
Advertisement
करवाढ नाही, नवे कर प्रस्तावित नाहीत; मुंबई महापालिकेचं बजेट सादर
देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर मुंबई.. एका छोट्या राज्याचं बजेट जितकं असेल, तेवढं बजेट या एका शहराचं आहे. म्हणूनच मुंबई महापालिकेला आशिया खंडातील श्रीमंत महापालिका म्हणतात.
मुंबई : आर्थिक वर्ष 2019-20 साठी मुंबई महापालिकेचं अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर करण्यात आलं आहे. महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना अर्थसंकल्पाची प्रत सादर केली. मुंबई महापालिकेच्या 2019-20 या वर्षासाठी 30 हजार 692 कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर मुंबई.. एका छोट्या राज्याचं बजेट जितकं असेल, तेवढं बजेट या एका शहराचं आहे. म्हणूनच मुंबई महापालिकेला आशिया खंडातील श्रीमंत महापालिका म्हणतात.
बेस्ट
- बेस्टमधील सुधारणांसाठी 34.10 कोटींची तरतूद
- बेस्ट कर्मचाऱ्यांच्या निवासी वसाहतींसाठी 10 कोटींची तरतूद
- मुंबई विकास आराखडा अंमलबजावणीसाठी 3323.64 कोटींची तरतूद
रस्ते
- मुंबईतील रस्त्यांसाठी होणाऱ्या बजेटमधील तरतुदींमध्ये यंदा 144.14 कोटींची वाढ करण्यात आली आहे.
- कोस्टल रोड - शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पासाठी 1600 कोटींची तरतूद
- गोरेगांव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद
- मुंबईतील रस्ते दुरुस्तीसाठी 1520 कोटींची तरतूद
पदपथ स्वतंत्र तरतूद
- पदपथांवर पेव्हर ब्लॉकऐवजी स्टेन्सिल काँक्रिट, मार्बल चिप्सचा वापर होणार, यासाठी 100 कोटींची स्वतंत्र तरतूद
- मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोल्ड मिक्स तंत्रज्ञानासाठी 15.86 कोटी रुपये
- मुंबईतील वाहनतळांचा प्पश्न सोडवण्यासाठी 3 कोटी रुपये
- एलईडी दिव्यांसाठी 50 कोटी रुपये
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज, 5 हजार कोटींची वाढ होणार?
पूल विभाग
- मुंबईतील जुने पूल, भुयारी मार्ग, स्काय वॉक, पादचारी पूल, उड्डाणपूल यांची दुरुस्ती, देखभाल तसंच नवे पूल बांधणी, विस्तारीकरण यासाठी 600 कोटींची तरतूद
- उड्डाणपुलाखालील जागांच्या सौंदर्यीकरणासाठी 19 कोटी रुपये
- वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान, प्राणीसंग्राहालय-राणीबागेसाठी- 110.78 कोटी रुपये
मुंबईतील पाणी तुंबण्याच्या समस्येवर
- हिंदमाता पूरप्रवण क्षेत्रासाठी 53 कोटी रुपये
- नाल्यातील तरंगता कचरा थेट समुद्रात जाण्यापासून रोखण्याकरता तरंगते ट्रॅशबुम बसवण्यात आले आहेत, त्यासाठी 1.20 कोटी रुपये
- मॅनहोलसाठी 1.20 कोटी रुपये
- मुंबईतील छोटे, मोठे नाले, मिठी नदी यांतून हाळ काढण्यासाठी 162 कोटींची तरतुद
- मिठी नदीच्या सौंदर्यीकरणासाठी -- 115 कोटी
- दहिसर, पोयसर, ओशिवरा नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी 5.20 कोटी
- गारगाई-पिंजाळ नदीजोड प्रकल्प-- 122.90 कोटी
रुग्णालय/आरोग्य
- मुंबईतील आरोग्य सेवेसाठी एकूण 3601.86 कोटींचं हेल्थ बजेट
- आपली चिकित्सा- मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये होणाऱ्या विविध 101 चाचण्यांसाठी 16.38 कोटी
कचऱ्यापासून उर्जानिर्मिती
- देवनार डम्पिंग ग्राऊंड इथे कचऱ्यापासून उर्जानिर्मिती करण्याच्या प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
करदात्या मुंबईकरांना दिलासा
- यंदाच्या बजेटमध्ये कोणतीही करवाढ नाही किंवा नवे कर प्रस्तावित नाहीत
बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी 5 कोटींची तरतूद
मुंबईच्या महापौरांना पुन्हा नवे घर मिळणार
मुंबईचे महापौर पुन्हा दादरच्या शिवाजी पार्क इथेच राहायला जाणार
शिवाजी पार्क इथे अंदाजे 2,745 चौरस मीटर क्षेत्रात महापौरांचं नवं निवासस्थान बांधलं जाईल
या प्रकल्पाचं काम 2019-20 मध्ये सुरु होईल
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात महापौरांच्या शिवाजी पार्क इथल्या नव्या प्राधिकृत निवास्थानासाठी एक कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement