एक्स्प्लोर
Advertisement
पावसाळ्यात पाणी तुंबलं, तर मुंबईकरांनी सहन करावं : बीएमसी
पावसाळ्यातील कामादरम्यान जर पाणी तुंबलं, तर मुंबईकरांनी सहन करावं असं वक्तव्य प्रशासनाकडूनच करण्यात आलं आहे.
मुंबई : सध्या पाण्याचा संपूर्ण निचरा होण्यासाठी मुंबईत पर्जन्यजलवाहिन्या टाकण्याचं काम सुरु आहे. मात्र पावसाळ्यात या कामादरम्यान जर पाणी तुंबलं, तर मुंबईकरांनी सहन करावं असं वक्तव्य प्रशासनाकडूनच करण्यात आलं आहे.
स्थायी समितीत पर्जन्यजलवाहिनी विभागाचे प्रमुख अभियंता विद्याधर खंडकर यांनीच तुंबलेलं पाणी सहन करण्याचं आवाहन मुंबईकरांना केल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मेट्रो, MMRDA ची पालिकेशी चर्चा
मुळात पर्जन्यजलवाहिन्या टाकण्याचं काम हे पावसाळ्यापूर्वीच होणं अपेक्षित असतं. मात्र प्रशासनाला पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा निपटारा करता आला नाही. प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा परिणाम म्हणून मुंबईत पाणी तुंबलं, तरी मुंबईकरांनीच सहनशीलता दाखवावी, हे मुंबई महापालिका प्रशासनानं केलेलं आवाहन निर्लज्जपणाचं मानलं जात आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement