एक्स्प्लोर

Mumbai Water Cut: पाणीकपातीचा 'मेगाब्लॉक'; मुंबईत उद्या-परवा 24 तासांसाठी पाणीकपात, तुमच्या भागात काय असणार स्थिती?

Mumbai Water Cut: पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईत उद्या-परवा अर्थात 29-30 नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा बंद असणार आहे.

Mumbai Water Cut: मुंबईतील विविध भागांमध्ये उद्या आणि परवा अर्थात 29-30 नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा (Mumbai Water Supply) विस्कळीत राहणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईतील काही ठिकाणचा पाणी पुरवठा 24 तास बंद राहणार आहे. मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये मंगळवारी, 29 नोव्हेंबर सकाळी 8.30 वाजल्यापासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 8.30 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार आहे. पवई आणि वेरावली दरम्यान पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामध्ये पाणी गळती रोखण्यासह इतर कामांचाही समावेश आहे. पवईतील 300 मिमी पाइपलाइन तसेच पाण्याचा प्रचंड दाब असलेल्या 1800 मिमी पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

या प्रभागात पाणीपुरवठा बंद असणार

मुंबईतील के-पश्चिम या प्रभागातील पाणीपुरवठा संपूर्णपणे बंद असणार आहे. तर, के-पूर्व, एच-पश्चिम, एच-पूर्व, पी-दक्षिण, एस, एल आणि एन या प्रभागातील काही ठिकाणी पाणीपुरवठा होणार नाही. 

के पश्चिम वॉर्डात राहणार्‍या सुमारे 7.5 लाख लोकांना 24 तासांच्या पाणीकपातीचा फटका बसेल असा अंदाज आहे. ओशिवरा, लोखंडवाला, विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि जुहू यासारख्या ठिकाणी 24 तास पाणी पुरवठा बंद असणार आहे. या या प्रभागात असणाऱ्या महापालिकेच्या कूपर रुग्णालयासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

के-पूर्व भागात अंधेरी पूर्व, एमआयडीसी, सीप्झ, जोगेश्वरी पूर्व आदी ठिकाणांचा समावेश आहे. गुंदवली, नेहरू नगर आणि आझाद नगर या भागात 29 नोव्हेंबर रोजी पाणीकपात होणार आहे. तर आनंद नगर, समर्थ नगर आणि शेर-ए-पंजाब भागात 30 नोव्हेंबरला पाणीपुरवठा कपात होणार आहे. तर, उर्वरित भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. 

या ठिकाणी कमी दाबाने पाणी

तर, के-पूर्व, जी-उत्तर, पी-दक्षिण या प्रभागात पाणीपुरवठा होणार आहे. मात्र, हा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. एच-पश्चिम प्रभागातील पाणीपुरवठ्याची वेळ कमी करण्यात येणार आहे. तर, 30 नोव्हेंबर रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. 
 
मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात पाणीपुरवठा वाढवण्यासाठी आणि पाणीपुरवठ्याचे जाळे आणखी मजबूत करण्यासाठी मुंबई महापालिकेच्यावतीने वेरावली ते घाटकोपर दरम्यान, 6.6 किलोमीटरचा बोगदा बांधला जात आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget