एक्स्प्लोर
भाजपची नवी खेळी, मुंबईत 12 ठिकाणी छटपूजा
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने नवी खेळी केली आहे. उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपनं आता छटपूजेचं कार्ड काढलं आहे.
यंदा दहीहंडी, गणपती उत्सवाप्रमाणेच छटपूजाही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाईल, अशी घोषणा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली.
भाजपच्या रणनीतीनुसार यंदा मुंबईत कुलाबा, दादर, शिवाजी पार्क, पवई, चेंबूर, जुहू चौपाटीसह 12 ठिकाणी छटपूजेचं आयोजन करण्यात येणार आहे. तसंच जुहूच्या कार्यक्रमात स्वत: मुख्यमंत्री सहभागी होतील, असंही शेलार यांनी सांगितलं.
शिवसेना आणि मनसेचा छटपूजेला असलेला विरोध पाहता भाजपनं परप्रांतियांच्या मतांसाठी तयार केलेली रणनीती नव्या वादाची नांदी ठरणार आहे.
यापूर्वी शिवसेनेने आणि मनसेने उत्तर भारतीयांनी मुंबईत छटपूजा करुन दाखवावीच असं आव्हान दिलं होतं. मात्र आता सत्ताधारी भाजपनेच छटपूजेचं आयोजन केल्यामुळे वादावादीची शक्यता जास्त आहे.
कुठे कुठे छटपूजा?
- 12 ठिकाणी साजरी छटपूजा
- कुलाबा, दादर शिवाजी पार्क, पवई, चेंबूर, संजय गांधी पार्क, जुहू चौपाटी, वर्सोवा, मालाड ,अक्सा- मारवे, भांडुप, मुलुंड, कुर्ला,बोयसर
- जुहूला मुख्य कार्यक्रम ज्यात मुख्यमंत्री स्वतः सहभागी होणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement