एक्स्प्लोर
पनवेलमध्ये भाजपात बंडखोरी, 50 कार्यकर्त्यांचा पक्षाला रामराम
![पनवेलमध्ये भाजपात बंडखोरी, 50 कार्यकर्त्यांचा पक्षाला रामराम Bjp Rebellion In Panvel Mnc Election 2017 पनवेलमध्ये भाजपात बंडखोरी, 50 कार्यकर्त्यांचा पक्षाला रामराम](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/29092015/panvel-bjp.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी मुंबई : एकीकडे भाजपात प्रवेश करण्यासाठी पक्षाला सोडचिठ्ठी देण्यासाठी अनेकजण उत्सुक असल्याचं दिसतं आहे. मात्र, पनवेल महापालिके अंतर्गत येणाऱ्या खारघरमध्ये अगदी उलटं चित्र दिसतं आहे. खारमधल्या 50 पदाधिकाऱ्यांनी भाजपला रामराम ठोकला आहे.
प्रशांत ठाकूर यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून गुंडांना उमेदवारी दिल्याचा आरोप करत निष्ठावानांनी बंडखोरांनी केली आहे. खारघरमध्ये मोडणाऱ्या 12 वॉर्डापैकी 7 ते 8 ठिकाणी भाजपचे बंडखोर उभे राहणार आहेत. त्यामुळं खारघरमध्ये भाजपला विरोधकांप्रमाणेच बंडखोरांचा सामना करावा लागणार आहे.
बंडखोरी केलेल्यांमध्ये जिल्हा खजिनदार अभिमन्यू पाटील आणि तालुका खजिनदार अनंत तोडेकर यांचा सहभाग आहे.
गेल्या 10 वर्षांपासून माजी खासदार रामशेठ, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या बरोबर निष्ठेने काम केले. सदस्य मोहीम राबवून लोकांचा कल भाजपाकडे वळविला. मात्र यानंतरही आपल्या सारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांना रामशेठ ठाकूर यांनी डावलून गुंड प्रवत्तीच्या लोकांना उमेदवारी दिल्याचा आरोप अभिमन्यू पाटील आणि अनंत तोडेकर यांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)