एक्स्प्लोर
Advertisement
अमित शाह 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंची भेट घेणार!
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे अमित शाह अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदाच 'मातोश्री'वर जाणार आहेत.
या भेटीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतीपदी एनडीएचा उमेदवार निवडणूक येण्यासाठी भाजपला शिवसेनेच्या मतांची गरज आहे. गेल्या दोन्ही राष्ट्रपती निवडणुकीच्यावेळी शिवसेनेने एनडीएत असूनही युपीएच्या उमेदवाराला मतं दिली होती. त्यामुळे आता खुद्द अमित शाह यांनीच पुढाकार घेतला आहे.
त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांपासून विविध मुद्द्यांवरुन शिवसेना आणि भाजपमधले संबंध ताणले आहेत. त्यामुळे अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत नेमकं काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
असा असेल दौरा!
अमित शाह उद्यापासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शाह रविवारी दुपारी 12 वाजता मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे.
याशिवाय शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थनावर जाऊन अभिवादनही करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
शाह-ठाकरे भेटीविषयी उत्सुकता
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या तोंडावरच ही भेट होत असल्याने देशभरातील मीडियात या भेटीविषयी औत्सुक्य आहे. या दोन्ही नेत्यांमधील ‘चाय पे चर्चा’त नेमकं काय घडतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.
भाजप नेते सोनियांची मनधरणी करणार
राष्ट्रपती निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्यानुसार भाजप नेते येत्या शुक्रवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा करणार आहेत. राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार देऊ नये म्हणून भाजप नेते सोनिया गांधी यांना आग्रह धरणार असल्याचं सांगण्यात येतं. भाजपने राष्ट्रपतीपदाच्या निवडीसाठी राजनाथ सिंह, अरुण जेटली, व्यंकय्या नायडू यांची निवड केलीय. ते सोनिया गांधींची मनधरणी करतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement