एक्स्प्लोर
देशातील श्रीमंत बिल्डर्सच्या यादीत आमदार लोढा अव्वल
मंगलप्रभात लोढा हे गेल्या वर्षी या यादीत दुसऱ्या स्थानावर होते. 2017 मध्ये त्यांची मालमत्ता 18 हजार 610 हजार कोटी रुपये होती.
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिकांच्या यादीत भाजपचे मुंबईतील आमदार मंगलप्रभात लोढा अव्वल ठरले आहेत. तब्बल 27 हजार 150 कोटी रुपयांची मालमत्ता असलेले लोढा मुंबईतील मलबार हिल या उच्चभ्रू परिसरातील आमदार आहेत. GROHE हरुन इंडिया रिअल इस्टेटने श्रीमंतांची यादी बुधवारी जाहीर केली.
मंगलप्रभात लोढा हे गेल्या वर्षी या यादीत दुसऱ्या स्थानावर होते. 2017 मध्ये त्यांची मालमत्ता 18 हजार 610 हजार कोटी रुपये होती. 1995 पासून ते सलग पाच वेळा भाजपच्या तिकीटावर आमदारपदी निवडून येत आहेत.
एम्बसी प्रॉपर्टी डेव्हलपमेंटचे जितेंद्र विरवानी यंदा यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची मालमत्ता 23 हजार 160 कोटी रुपये इतकी आहे. त्यांनीही गेल्या वर्षीच्या तुलनेत एक पायरी वर गाठली आहे. गेल्या वर्षी तिसऱ्या स्थानी असताना त्यांच्याकडे 16 हजार 700 कोटी रुपयांची प्रॉपर्टी होती.
डीएलएफचे प्रमोटर राजीव सिंग या वर्षी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची मालमत्ता 17 हजार 690 कोटी रुपये आहे. राजीव सिंग यांचे पिता के पी सिंग गेल्या वर्षी पहिल्या क्रमांकावर (23 हजार 460 कोटी) होते. मात्र एनआरसीमध्ये रिअल इस्टेट इंडस्ट्रीला उतरती कळा लागल्याने त्यांना मोठा फटका बसला. मात्र त्यांची कन्या रेणुका तलवार या 2780 कोटींच्या मालमत्तेसह सर्वात श्रीमंत महिला बांधकाम व्यावसायिक ठरल्या आहेत.
रिअल इस्टेट व्यावसायिकांसाठी मुंबई हे हॉट डेस्टिनेशन आहे. शंभर जणांच्या यादीत मुंबईचे 35, दिल्लीचे 22 तर बंगळुरुचे 21 व्यावसायिक आहेत. शंभर जणांची एकूण मालमत्ता दोन लाख 36 हजार 610 कोटी रुपये आहे. यादीत फक्त भारतीयांचा समावेश असून 30 सप्टेंबर 2018 रोजी असलेली मालमत्ता ग्राह्य धरण्यात आली आहे.
आरएमझेडचे 24 वर्षीय कुणाल मेंडा हे शंभर जणांच्या यादीतील सर्वात तरुण व्यावसायिक ठरले आहेत, तर ईस्ट इंडिया हॉटेल्सचे 89 वर्षीय पृथ्वीराज सिंग ओबेरॉय हे सर्वात वयोवृद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement