एक्स्प्लोर

वीज बिलात सवलतीची घोषणा म्हणजे ठाकरे सरकारचे लबाडाघरचे आवतान : अतुल भातखळकर

वीज बिलात सवलतीची घोषणा करुन ठाकरे सरकारने जनतेला फसवल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलाय. आगामी अधिवेशनात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई : वीज बिलात सवलतीची घोषणा म्हणजे ठाकरे सरकारचे लबाडाघरचे आवतान, असल्याची टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. आगामी अधिवेशनात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. राज्यातील ग्राहकांना भरमसाठ आलेल्या वीजबिलात सवलत देण्याची ठाकरे सरकारची घोषणा ही केवळ फसवणूक असल्याचे वित्त विभागाने या प्रस्तावास नकार दिल्यानंतर स्पष्ट झाले आहे. पहिल्या दिवसापासून अवास्तव आलेल्या वीज बिलांना वीज नियामक कायद्यातील कलम 4 चा उपयोग करून स्थगिती देण्याची मागणी मी करत होतो. परंतु, महाविकास आघाडी सरकारने ते करण्यास नकार दिला असल्याचे भातखळकर म्हणाले. भाजपच्या आंदोलनानंतर व जनतेच्या रोषानंतर ऊर्जामंत्री व महाविकास आघाडी सरकारचे अन्य मंत्री वीज बिलात सवलत देणार असल्याच्या फसव्या घोषणा करत राहिले, हे आता स्पष्ट झाले आहे. परंतु, ही सवलत देण्यासाठी लागणारे 1000 कोटी रुपये देण्यास राज्याच्या वित्त विभागाने नकार दिला आहे हे आता अधिकृत झाले आहे. या सरकारचे वीज कंपन्यांशी साटंलोटं असल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे. वीजबिलातून सूट मिळण्याची शक्यता मावळली; ऊर्जा मंत्र्यांची घोषणा फसवी होती का? : चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जामंत्र्यांनी फसव्या घोषणा केल्याबद्दल व यासंदर्भात लवकरचं मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय केला जाणार असल्याचे खोटे सांगितल्याबद्दल विधानसभेच्या आगामी अधिवेशनात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात हक्कभंगाचा ठराव मांडणार असल्याचे भातखळकर म्हणाले. शालेय विद्यार्थ्यांच्या फीच्या बाबतीत जशी राज्य सरकारने फसवणूक केली. तसाच हा प्रकार असून वाढीव वीजबिलांमुळे त्रस्त झालेल्या राज्यातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा निंदनीय प्रकार असल्याचेही भातखळकर म्हणाले. खोट्या घोषणांमुळे भाजप व जनता फसेल अशा भ्रमात राज्य सरकारने राहू नये, 300 युनिटपर्यंतची सरसकट वीजबिले माफ झाल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही आमदार भातखळकर यांनी दिला आहे. Electricity Bill | वीज ग्राहकांना मदत करण्याची सरकारची भावना, योग्य वेळी निर्णय घेऊ - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

महत्त्वाच्या बातम्या

Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Mumbai Voter List News: मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Embed widget