अंबानी कुटुंबासाठी भाजपने महाराष्ट्राच्या विधानसभेचा दुरुपयोग केला : नाना पटोले
अंबानी कुटुंबासाठी भाजपने महाराष्ट्राच्या विधानसभेचा दुरुपयोग केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेक्षाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
सांगली : भाजपकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा उद्योग सुरू आहे. तसेच अंबानीसाठी महाराष्ट्राच्या विधानसभेचा भाजपाकडून दुरुपयोग करण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच राज्यातील वीज तोडणीवरून सरकारला गर्भीत इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी सांगलीमध्ये आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. सचिन वाझे प्रकरणावरून बोलताना महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी सचिन वाझेला खलनायक ठरवण्याचे काम भाजपकडून करण्यात आलेलं आहे. डबल ढोलकी वाजवण्याचे काम भाजप करत असून मनसुख हिरेन प्रकरणी तपास आता एनआयएकडून सुरू आहे, त्यामुळे त्यांचा तपास होईल, असा टोला लगावाला आहे.
तसेच अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या सोफ्टक प्रकरणी बोलताना, अंबानीच्या घरांपासून लांब ती गाडी सापडली होती. त्यामध्ये स्फोटक नसल्याचेही समोर आलेलं आहे. मात्र, असे असताना अंबानी कुटुंबाला झेड प्लस सुरक्षेसाठी, त्यांच्या घरावर हेलिकॉप्टर परवानगी मिळावी यासाठी भाजपने महाराष्ट्राच्या विधानसभेचा दुरुपयोग केला, अशी टीका पटोले यांनी केली आहे.
सचिन वाझे यांना अडकवलं जातंय : वाझे कुटुंबीय
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर त्यांच्या कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. सचिन वाझे यांचे बंधू सुधर्म वाझे यांनी एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला आहे. सचिन वाझे यांना या प्रकरणात अडकवण्यात येत आहे. त्यांना अटक झाल्याची माहिती आम्हाला कुणीही दिली नाही. मीडियाच्या माध्यमातून त्यांना अटक झाल्याचं आम्हाला कळालं. सचिन वाझे यांच्या पत्नी यांनाही ही माहिती नव्हती, अशी माहिती सुधर्म वाझे यांनी दिली आहे.
सचिन वाझे आणि सुदर्म वाझे यांची दोन दिवसांपूर्वी मुंबईत भेट झाली होती. त्यावेळ सचिन वाझे प्रचंड तणावात होते. सचिन वाझे यांनी काल जे स्टेटस ठेवलं त्यात त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली, असं सुधर्म वाझे यांनी सांगितलं. ते सक्षम अधिकारी आहेत आणि एनआयएच्या तपासाला ते संपूर्ण सहकार्य करतील, असं सुधर्म वाझे यांनी म्हटलं. या प्रकरणात त्यांना अडकवण्यात आलं आहे. या प्रकरणात काहीही होऊ शकतं, याबाबत सुधर्म वाझे यांनी चिंता व्यक्त केली. एनआयएकडून कुटुंबियांशी कोणातही संपर्क साधला जात नाहीये आणि कुठलीही माहिती दिली जात नाही, असं सुधर्म वाझे यांनी सांगितलं.