एक्स्प्लोर
Advertisement
भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या भेटीला
अयोध्यातील राम मंदिराच्या मुद्द्यावर मुरली मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे.
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 'मातोश्री' या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी दोघांची तब्बल एक तास चर्चा झाली.
अयोध्यातील राम मंदिराच्या मुद्द्यावर मुरली मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तून आज राम मंदिराच्या प्रश्नावरुन भाजपवर हल्लाबोल करण्यात आला होता.
राम मंदिर उभारण्यास दिरंगाई का होत आहे, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. 'राम मंदिरासाठी साधू, संत आणि करसेवकांचे बलिदान झाले आहे. गुजरातेत ‘गोध्रा कांड’ घडले तेसुद्धा रामभक्तांचे बळी गेल्यामुळेच. त्यामुळे संसदेच्या मैदानात राममंदिरावर चर्चा होऊ द्या' असं आवाहन शिवसेनेने केलं आहे.
याआधीच उद्धव ठाकरे यांनी अयोध्या आणि वाराणसीला जाण्याचा इशारा दिला आहे.
भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव आणि आदित्य ठाकरेंची भेट घेतल्यानंतर पहिल्यांदाच भाजपचा वरिष्ठ नेता शिवसेना पक्षप्रमुखांच्या भेटीला मुंबईत आला.
शिवसेना आणि भाजप युतीत असूनही दोघांमध्ये कुरबुरी सुरु आहेत. शिवसेनेने मात्र यापुढील निवडणुका स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement