एक्स्प्लोर
भाजप पदाधिकाऱ्याची गुंडगिरी, महिलेचे केस धरुन बेदम मारहाण
मी लेडीजला कोणतीही मारहाण केली नाही, असं स्पष्टीकरण भाजपचे पदाधिकारी जे. पी. सिंग यांनी दिले.
नालासोपारा (ठाणे) : नालासोपाऱ्यात भाजपा पदाधिका-याची दादागिरी समोर आली आहे. सोसायटीतील पार्किंगच्या किरकोळ वादातून भाजपा पदाधिकाऱ्यांनी एका महिलेसह तिच्या पतीला केस धरुन बेदम मारहाण केली.
धक्कादायक म्हणजे, पिडित महिलेने भाजपा पदाधिकाऱ्याची तक्रार तुळिंज पोलिस ठाण्यात केली. मात्र एवढी मारहाण होऊनही पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याचीच नोंद केली.
मला गुन्हा दाखल करायचा आहे, माझा FIR घ्या, असे सांगत असतानाही महिलेकडे तुळिंज पोलिसांनी दुर्लक्षच केल्याचे समोर आले आहे.
नालासोपारा पूर्वेकडील ओसवाल नगरी या परिसरात लोटस ही इमारत आहे. या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर लिना आणि मनोजकुमार दुहन हे कुटुंबीय राहतात. याच इमारतीमध्ये भाजपचे पदाधिकारी जे. पी. सिंगही राहतात.
जे. पी. सिंग हे भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाचे ठाणे-पालघर विभागाचे अध्यक्ष आहेत.
सोसायटीमध्ये पार्किंगच्या कारणावरुन अपसात वाद सुरु झाला होता. हा वाद सुरु असतांना मनोजकुमार दुहन यांनीही दुचाकी पार्किंगमध्ये चारचाकी पार्किंग का करता, याच वादातून चक्क जे. पी. सिंग यांनी मनोजकुमार यांना मारण्यास सुरवात केली असल्याचा आरोप आहे.
एवढेच नाही तर आपल्या पतीला मारले जाते, हे पाहून लिना दुहनही सहाव्या मजल्यावरुन खाली उतरल्या आणि माझ्या नवऱ्याला का मारले असा जाब विचारला असता, जे. पी. सिंग याने लिना यांचे केस धरुन त्यांच्या तोंडावर बेदम मारहाण केली असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
याबाबत मारहाण झालेले पीडित कुटुंब तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता तुमच्या सोसायटीचा वाद आहे. तुम्ही आपसात मिटवा असे सांगून केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
जे. पी. सिंग आणि त्याचा साथीदार हे दोघेही दारु प्यायले होते. पोलिस ठाण्यात यांचे मेडिकल करा असे सांगून ही मेडिकल न करता त्यांना सोडून देण्यात आल्याचा आरोपही महिलेने केला आहे.
एका भाजपा पदाधिकाऱ्याने बेदम मारहाण करुनही पोलीस गुन्हा दाखल करुन घेत नाहीत. एका महिलेला मारहाण होते आणि पोलिस मात्र भाजपा पदाधिकाऱ्याला साथ देतात, असा आरोपही पीडित महिलेने केला आहे.
याबाबत भाजपाच्या पदाधिकाऱ्याला विचारले असता त्यानी आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे. मी फक्त सोडवण्याचा प्रयत्न करत होते. मी लेडीजला कोणतीही मारहाण केली नाही, असं स्पष्टीकरण भाजपचे पदाधिकारी जे. पी. सिंग यांनी दिले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement