एक्स्प्लोर
'त्या' विधानाबाबत स्पष्टीकरण द्या, आ. अनिल गोटेंना कारणे दाखवा नोटीस
मुंबई: भाजपचे आमदार अनिल गोटे यांना संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. विधानपरिषद बरखास्त करावी अशी सरकारची किंवा पक्षाची भूमिका नसताना तुम्ही वारंवार अशी वक्तव्य का करत आहात? असा सवालही त्यांना विचारण्यात आला आहे.
तसेच या प्रकरणी तीन दिवसात स्पष्टीकरण द्यावे अन्यथा कारवाई होईल. अशा स्पष्ट शब्दात गोटेंना सुनावण्यात आलं आहे.
विधानपरिषद बरखास्त करा अशी मागणी भाजपचे आमदार अनिल गोटेंनी केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद विधानपरिषदेमध्ये उमटले होते. अनिल गोटेंनी विधानसभेत बोलताना विधानपरिषद बरखास्त करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर त्यांचं वक्तव्य कामकाजातून काढण्यात आलं होतं.
दरम्यान, याबाबत बोलताना काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली होती. ‘गोटेंचं वक्तव्य हे सभागृहाच्या उंचीला शोभणारं नाही’. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी गोटेंना सुनावलं होतं.
अनिल गोटेंनी विधानपरिषद बरखास्तीची मागणी केल्यानंतर सर्व पक्षातून टीकेची झोड उठली. त्यानंतर या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत निवेदन सादर केलं होतं. यावेळी त्यांनी गोटेंचं वक्तव्य सरकारला आणि वैयक्तिक आपल्यालाही आवडलं नसल्याचं सांगितलं होतं.
‘संविधानाने हे सभागृह तयार झालं आहे, कोणाच्या सांगण्यावरून ते तयार झालेलं नाही.’ असंही मुख्यमंत्री म्हणाले. तसंच विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असल्यानं या सभागृहाबद्दल कुठलीही द्विधा मन:स्थिती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
संबंधित बातम्या:
अनिल गोटेंचं वक्तव्य सभागृहाच्या उंचीला न शोभणारं: मुख्यमंत्री
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement