एक्स्प्लोर

सूरज परमार आत्महत्या: आरोपी सुधाकर चव्हाणला भाजपकडून तिकीट?

ठाणे: बिल्डर सूरज परमार आत्मह्त्याप्रकरणी जेलवारी करून आलेले नगरसेवक सुधाकर चव्हाण यांची भाजपवारी निश्चित झाली आहे. भाजपमध्ये कोणताही प्रवेश न करता 3 तारखेला सुधाकर चव्हाणला एबी फॉर्म देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे. चव्हाण हे ठाण्यात मनसेचे नगरसेवक होते. पण त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन बाहेरच्या रस्ता दाखविण्यात आला होता. सुधाकर चव्हाणसोबत प्रभागातील इतर तीन वॉर्डमध्येही भाजपकडून उमेदवारी देण्यात आहे. या तीन वॉर्डमध्ये देखील त्यांच्या समर्थकांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून समजतं आहे. दरम्यान आणखी एका वादग्रस्त चेहऱ्याला भाजपकडून उमेदवारी निश्चित झाल्याची जोरदार चर्चा सध्या ठाण्यात सुरु आहे. सुधाकर चव्हाण यांचा इतिहास   ठाण्यात 90च्या दशकात सुधाकर चव्हाण रिक्षा चालवण्याचं काम करायचे. 1992 मध्ये त्यांनी पालिकेची निवडणूक लढवली आणि नगरसेवक झाले. 2012 ला मनसेच्या तिकीटावर त्यांनी शिवाई परिसरातून पालिकेत एन्ट्री केली. मात्र पक्षाची शिस्त न पाळल्यानं मनसेने त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला. परिवहन समिती, स्थायी समितीसारख्या अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं. पण त्यांच्या राजकीय प्रवासाइतकीच गुन्हेगारी पार्श्वभूमीही गडद आहे. सुधाकर चव्हाण यांच्यावर 9 गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. टाडाअंतर्गतही त्यांच्यावर गुन्हा दाखल होता. खंडणी, जीवे मारण्याची धमकी, फसवणूक केल्याचाही गुन्हा त्यांच्यावर नोंद आहे. बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या डायरीतही चव्हाणांचं नाव आहे. शिवाय नंदलाल समितीने पालिकेतील 5 भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चव्हाणांवर ठपका ठेवला होता. त्यामुळे अशा लोकांना फक्त पक्ष वाढवण्यासाठी का घेतलं जातं आहे?, असा सवाल विचारला जातोय. उल्हासनगरमध्येही गुन्हेगारीचा इतिहास असलेल्या पप्पू कलानींचा मुलगा ओमी कलानीनं भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या निवडणुकीत ओमी कलानीवर सुनील सुखरामानीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीआयडीने ओमीला अटक करुन कोर्टातही हजर केलं होतं. त्यामुळे अशा लोकांच्या जीवावर भाजप स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करणार का?, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत शाश्वत धर्मासाठी राष्ट्रवादीतील अनेक डागाळलेले चेहरे भाजपात घेतले. त्यामुळे संघशिस्तीच्या भाजपला गुन्हेगारांचं वावडं राहिलं नाही का?, की भाजपचा खरा चेहरा आता समोर येतोय?, असा प्रश्न विरोधकांनी विचारला तर आश्चर्य वाटायला नको. सूरज परमार आत्महत्या प्रकरण: प्रख्यात बांधकाम व्यावसायिक एमसीएचआयचे (महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्रीज)  अध्यक्ष सूरज परमार (४९) यांनी स्वत:च्या रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी 7 ऑक्टोबर 2015 रोजी दुपारी घडली. घोडबंदर रोडवरील कॉसमॉस हेवन व्हिलेज या त्यांच्या बांधकाम साईटवरील सँपल प्लॅटमध्ये दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांनी मानेत एक राऊंड फायर केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. संबंधित बातम्या:

भाजपमध्ये आणखी एका वादग्रस्त चेहऱ्याला प्रवेश?

  सूरज परमार आत्महत्या : चारही नगरसेवकांचं पद रद्द करण्याचे आदेश

महत्त्वाच्या बातम्या

Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Sahil Wakode Death Case: 'चूक मान्य, मला एक संधी द्या, माफ करा...', आयआयटी बॉम्बे कॉपीप्रकरणातील साहिल लेखी निवेदनात काय-काय म्हणाला? नवी माहिती समोर, तपासाला नवं वळण
'चूक मान्य, मला एक संधी द्या, माफ करा...' आयआयटी बॉम्बे कॉपीप्रकरणातील साहिल लेखी निवेदनात काय-काय म्हणाला? नवी माहिती समोर, तपासाला नवं वळण
Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Eknath Shinde: मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Embed widget