एक्स्प्लोर
मुंबईकरांची मालमत्ता करातून सुटकेसाठी सेना-भाजपमध्ये स्पर्धा
आज मुंबईच्या विकास आराखड्याच्या चर्चेत भाजपने 500 चौ. फुटांपासून 750 चौ. फुटांपर्यंत मालमत्ता करात सूट देण्याची मागणी करुन शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबई : मुंबईकरांना मालमत्ता करातून सूट देण्याच्या निर्णयावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे.
मुंबईतील 700 ते 750 चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्याची भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत मागणी केली. तर दुसरीकडे, शिवसेनेने महापालिका निवडणुकीच्या वचननाम्यात 500 चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्याची घोषणा केली होती.
महापालिकेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित असल्याने अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. प्रस्ताव जाणीवपूर्वक रोखून ठेवल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
आज मुंबईच्या विकास आराखड्याच्या चर्चेत भाजपने 500 चौ. फुटांपासून 750 चौ. फुटांपर्यंत मालमत्ता करात सूट देण्याची मागणी करुन शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
आशिष शेलार नेमके काय म्हणाले?
मुंबईत 500 ते 530 चौ. फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांना मालमत्ता करातून सूट योग्य नाही. त्यामुळे अनेकांवर अन्याय होईल. 700 ते 750 चौ. फुटापर्यंत घर असलेल्यांना मालमत्ता करात सूट मिळावी.” अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली. त्याचसोबत, गावठाण आणि कोळीवाडे यांचं सीमांकन सहा महिन्यात करण्याची मागणीही शेलार यांनी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement