एक्स्प्लोर
नवी मुंबईत उघड्या चेंबरमध्ये पडून बाईकस्वाराचा मृत्यू
नवी मुंबईत रस्त्यावरील उघड्या चेंबरमध्ये पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उलवे येथे घडली आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईत रस्त्यावरील उघड्या चेंबरमध्ये पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उलवे येथे घडली आहे. मोहन राठोड असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
राठोड हे उलवे सेक्टर 20 मध्ये राहत होते. काल (सोमवार) रात्री दीड वाजेच्या सुमारास ते बाईकवरून घरी जात होते. पण रस्त्यावरील उघडा असलेला चेंबर त्यांना न दिसल्याने ते सरळ दुचाकीसह चेंबरमध्ये जाऊन पडले. याच वेळी दुचाकीने अचानक पेट घेतला. राठोड हे चेंबरमध्येच अडकल्यानं त्यांना बाहेर पडता आलं नाही आणि त्यांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला.
संपूर्ण उलवे रोडवर अशाच पद्धतीने चेंबर्स उघडे असल्याने अनेकांचा अपघात झाला आहे. या प्रकरणी ठेकेदारावर एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका नागरिकाला आपल्या जीवाला नाहक मुकावं लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement