एक्स्प्लोर
Advertisement
स्टंटबाजी जीवावर बेतली, मुंबईत बाईक पेटून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू
मुंबई : मुंबईत टवाळखोर बाईकस्वरांनी सर्वसामान्य नागरिकांना अगदी त्रास दिला आहे. रात्रीच्या वेळेस मुंबईतल्या रस्त्यावर दुचाकी पळवून गोंधळ घालणाऱ्या गँगच्या बाईकची एकमेकांमध्ये टक्कर झाली. ही टक्कर एवढी भीषण होती की यामध्ये बाईकने पेट घेतला.
या दुर्घटनेत 22 वर्षीय अभिजीत गुरव याचा जागेवरच मृत्यू झाला. तर आकाश राजपूत आणि जफर शेख हे दोघे तरूण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर भाभा रुग्णालयात उपचार होणार आहेत.
शनिवार आणि रविवारच्या रात्री ही टोळी बांद्रा रिक्लेमेशन, नरीमन पॉईंट, बिकेसी, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे या परिसरात बाईकची रेस लावून जीवघेणी स्टंटबाजी करतात.
विशेष म्हणजे हे बाईकस्वार पोलिसांची कसलीही भीती न बाळगता वाहतुकीचे नियम तोडतात. या टोळीला कोणी रोखण्याचा प्रयत्न केला. तर त्याला मारहाण करायलाही ते मागेपुढे पाहत नाही. मात्र, आज हीच स्टंटबाजी या टोळीला जीवावर बेतली आहे.
बातमीचा व्हि़डीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement