एक्स्प्लोर
हळदीत नाचणाऱ्या टोळक्याला रोखल्याने दोघांवर जीवघेणा हल्ला
वैभव भोकरे उर्फ बंटी, ईश्वर उमराटकर, उज्वल पाटील, सनी पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या टोळक्याची नावं आहेत.
भिवंडी : एका लग्नाच्या हळदी कार्यक्रमात बेधुंद नाचणाऱ्या टोळक्याला रोखल्याने दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना भिवंडीत घडली आहे. चार जणांच्या टोळक्याने दोन तरुणांना पिस्तुलाचा धाक दाखवून, कमरपट्टा आणि ठोश्याबुक्क्याने बेदम मारहाण केली. भिवंडी तालुक्यातील काल्हेर इथे ही घटना घडली. या जीवघेण्या मारहाणीचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या हल्ल्याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून फरार टोळक्याचा पोलिस शोध घेत आहेत.
वैभव भोकरे उर्फ बंटी, ईश्वर उमराटकर, उज्वल पाटील, सनी पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या टोळक्याची नावं आहेत. या टोळक्याने प्रीतम प्रताप पाटीलचा भाऊ साहीलच्या हळदीच्या कार्यक्रमात बेधुंद नाचण्यास सुरुवात केली. त्यांच्या नाचण्याने हळदीच्या कार्यक्रम बेरंग होऊ लागला. त्यामुळे प्रीतम आणि चुलत भाऊ कुमार या दोघांनी टोळक्याला नाचण्यास मनाई केली. तसंच उशीर झाल्याने डीजे बंद करुन या टोळक्याला जाण्यास सांगितलं.
चार-चौघात नाचण्यास मनाई करुन अपमान केल्याची भावना टोळक्यातील चौघांच्या मनात होती. चिडलेल्या या चार जणांनी प्रीतम आणि कुमार या दोघांना छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणासमोर गाठलं. आरोपी वैभव भोकरेने प्रीतमच्या कानावर पिस्तुल रोखून जास्त नाटक केलं तर ठार मारेन, अशी धमकी दिली. त्यानंतर पिस्तुलाचा दस्ता डोक्यावर मारुन, कमरपट्टा आणि ठोश्याबुक्क्याने बेदम मारहाण केली.
दोन्ही जखमींवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र या घटनेने परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या गुन्ह्यात नारपोली पोलिस ठाण्यात कलम 307 अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement