एक्स्प्लोर
Advertisement
लग्न काही दिवसांवर, तिघा मित्रांचा अपघातात जागीच मृत्यू
असदचं 25 जानेवारी तर शोहिदचे 30 जानेवारी रोजी लग्न होणार होतं. मात्र त्यांच्या अपघाताच्या बातमीमुळे कुटुंब शोकसागरात बुडालं आहे
भिवंडी : बुलेट आणि कंटेनरच्या अपघातामध्ये बुलेटस्वार तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भिवंडी तालुक्यातील भिवंडी-वाडा रस्त्यावर हा अपघात झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यापैकी एका मित्राचं लग्न दोन दिवसांवर, तर दुसऱ्याचं आठवड्यावर येऊन ठेपलं होतं.
23 वर्षीय असद नाशिर मिर्झा, 20 वर्षीय शोहिद अन्सारी आणि औरंगाबादच्या 20 वर्षीय समीर फारुक अन्सारीचा मृत्यू झाला. असदचं 25 जानेवारी तर शोहिदचे 30 जानेवारी रोजी लग्न होणार होतं. मात्र त्यांच्या अपघाताच्या बातमीमुळे कुटुंब शोकसागरात बुडालं आहे, तर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भिवंडी शहरात गुलजारनगर आणि बंगालपुरा भागात राहणारे असद मिर्झा आणि शोहिद अन्सारी हे औरंगाबादहून आलेला मित्र समीर अन्सारीसोबत जेवायाला गेले होते. वाडा रोडवर एका हॉटेलमध्ये जेवून रात्रीच्या सुमारास ते भिवंडीकडे परत येत होते. बोरपाडाजवळ एका नागमोडी वळणावर समोरुन भरधाव आलेल्या कंटेनरने त्यांच्या बुलेटला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की असद आणि शोहिद यांचा जागेवरच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेला समीर रुग्णालयात नेलं जात असताना मृत्युमुखी पडला.
या घटनेनंतर कंटेनरचालक कंटेनरसह फरार झाला आहे. महापोली भागातून जाणाऱ्या नागरिकांनी अपघाताची माहिती भिवंडी तालुका पोलिसांना दिली. समीरला भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत होतं, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
कोल्हापूर
बातम्या
Advertisement