एक्स्प्लोर

पती-पत्नीचं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चॉपरने वार करुन खून

आरोपी इमरान रसूल सैय्यदचं मागील सहा महिन्यांपासून आपल्या पत्नीशी घटस्फोटावरुन भांडण सुरु होतं. मात्र या दोघं पती-पत्नीची समजूत घालण्यासाठी नदीम अनिस मोमीन त्यांच्या घरी गेले असता, तिथे आरोपी आणि मयत यांच्यात बाचाबाची झाली.

भिवंडी : नवरा-बायकोच्या भांडणात समजूत घालण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चॉपरने वार करुन हत्या झाल्याची धक्कादायक घटना भिवंडी शहरातील अजंठा कंपाऊंड परिसरात घडली आहे. नदीम अनिस मोमीन (वय 35 वर्ष) असे मयत इसमाचं नाव असून इमरान रसूल सैय्यद (वय 34 वर्ष) असे हत्या करणाऱ्या आरोपी नवऱ्याचं नाव आहे. आरोपी इमरान रसूल सैय्यदचं मागील सहा महिन्यांपासून आपल्या पत्नीशी घटस्फोटावरुन भांडण सुरु होतं. मात्र या दोघं पती-पत्नीची समजूत घालण्यासाठी नदीम अनिस मोमीन त्यांच्या घरी गेले असता, तिथे आरोपी आणि मयत यांच्यात बाचाबाची झाली. आमच्या भांडणात तू का येतो, असे म्हणत आरोपी आणि मयत यांच्यात हाणामारी झाली. मात्र या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी इमरान आणि त्याचा एक साथीदार यांनी मिळून नदीमला अजंठा कंपाऊंड परिसरात गाठलं. त्याच्यावर चॉपरने सपासप वार केले. या हल्ल्यात नदीम मोमीनचा जागीच मृत्यू झाला. नदीमला रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला पाहून आरोपी आण साथीदार पळून जात असताना, नागरिकांनी इमरानला पकडून चांगलाच चोप दिला. तर इमारनचा साथीदार घटनास्थळावरुन फरार झाला आहे. भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी इमरानवर हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतलं आहे. सध्या त्याच्यावर ठाणे उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोपी इमरानने हत्या करण्यापूर्वी हत्या करण्यास जात असतानाचा एक व्हिडीओ आपल्या पत्नीला पाठवला होता. तसंच व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलिंग करुन नदीमची हत्या करणार असल्याचं सांगितलं होतं. यानंतर भोईवाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी इमरानला अटक केली आहे. तसंच त्याच्या साथीदाराचा शोध पोलिस घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
Embed widget