भिवंडीत पुन्हा अग्नितांडव; दहा घरं भस्मसात, 60 जणांना सुरक्षित बाहेर काढले
भिवंडीत आगीचे सत्र काही थांबताना दिसत नाहीये. फातिमा नगर परिसरात असलेल्या पत्र्यांच्या घराला भीषण आग लागली. 50 ते 60 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात नागरिक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

भिवंडी : भिवंडीत आगीचे सत्र काही थांबताना दिसत नाहीये. शहरात पुन्हा एकदा अग्नितांडव पाहायला मिळालं. भिवंडी शहरातील फातिमा नगर परिसरात असलेल्या पत्र्यांच्या घराला भीषण आग लागली. या आगीत 9 ते 10 पत्र्याची घर अक्षरशः जळून खाक झाली आहेत. यावेळी घरात असलेल्या 50 ते 60 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात नागरिक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. आगीचं नेमकं कारण काय आहे ते अजूनही समजू शकलं नसला तरीही मात्र या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या तात्काळ दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात देखील अग्निशमन दलाला यश आले, मात्र या आगीत 9 ते 10 जणांची पत्र्यांची घर जळून त्यात त्यांचे संसार खाक झाले आहेत.
शहरातील फातिमानगर परिसर दाट रहिवासी परिसर आहे. याठिकाणी लोखंडी पत्र्यांची घरं मोठ्या प्रमाणात आहेत. रात्रीची वेळ असल्या कारणाने सर्वजण घरात झोपलेले होते. काल मध्यरात्रीनंतर अचानक एका बंद पत्र्याच्या घराला भीषण आग लागली. या आगीचा धूर दुसऱ्या घरात शिरत असल्याकारणाने घरातील लोक खडबडून जागे झाले. आग लागल्याचे समजल्यानंतर परिसरात आरडाओरडा सुरू झाला.

परिसरातील नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला याबाबत सांगितलं. काहीच वेळातच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केलं होतं. रांगेत असलेल्या पत्र्यांच्या घरांना भीषण आग लागली होती. घरातील नागरिकांना कसेबसे सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. जवळपास पन्नास ते साठ नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात नागरिकांना तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. मात्र या भीषण आगीत परिसरातील 9 ते 10 पत्र्यांची घरे जळून खाक झाली. यामध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळवले आहे.
संबंधित बातम्या
Bhiwandi Fire | भिवंडीत वळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत गोदामाला मोठी आग Bhiwandi Fire | कृष्णानगर परिसरातील इम्पायर डाइंगला भीषण आग Bhiwandi Fire | भिवंडीत पॉवर हाऊसलगतच्या शौचालयाला आग, पॉवर हाऊसपर्यंत आग न पोहोचल्याने अनर्थ टळला






















