एक्स्प्लोर
कुर्बानीला आणलेला रेडा झाला वेडा, वाहनांची तोडफोड
भिवंडीत कुर्बानीसाठी आणलेल्या रेड्याने मालकाच्या तावडीतून सुटका करत परिसरात धुमाकूळ घातला आणि रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली.

भिवंडी : भिवंडीत कुर्बानीसाठी आणलेला रेडा अक्षरशः वेडा झाला आणि त्याने पादचाऱ्यांना सळो की पळो करुन सोडलं. मालकाच्या तावडीतून सुटून रेड्याने परिसरात धुमाकूळ घातला आणि रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली. भिवंडी शहरातील बंदर मोहल्ला परिसरात या रेड्याने धुमाकूळ घातला होता. रस्त्यात येणारे नागरिक आणि वाहनांच्या तो अंगावर धावून जात होता. रेड्याने एका दुचाकी आणि चारचाकी वाहनाचं नुकसान केलं. या घटनेचं चित्रीकरण स्थानिक नागरिकांनी आपल्या मोबाइलमध्ये केलं आहे. घटनेची सूचना मिळताच भोईवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि ताबडतोब बंदोबस्त लावून रेड्याला कसंबसं महापोली परिसरामधील एका तबेल्यात ठेवण्यात आलं. पोलिसांनी अज्ञात मालकाविरोधात कलम 336 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. रेड्याच्या मालकाचा शोध पोलिस घेत आहेत.
आणखी वाचा























