एक्स्प्लोर

फेसबुकवरुन फसवणूक, नायजेरियन जोडप्याला हनी ट्रॅप लावून अटक

भांडुप (मुंबई) : मुंबईतील भांडुप पोलिसांनी हनी ट्रॅप लावून लोकांना फसवणाऱ्या नायजेरियन जोडप्याला जेरबंद केले आहे. न्नाग्बू ओरायजुका आणि नेहारिका ओरायजुका अशी या जोडप्याची नावं असून, ही दोघे फेसबुकवर सुंदर महिलांच्या नावे प्रोफाईल बनवून त्यात तरुणांना ओढून त्यांना लाखोचा गंडा घालण्यात पटाइत होते. न्नाग्बू ओरायजुकाने ‘मर्सी जॉन’ नावाने फेसबुकवर एक अकाउंट काढले होते. यावरुन तो लोकांना विशेषत: व्यापारी वर्गला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असे. ऑक्टोबर महिन्यात त्याने संदीप सिंग नावाच्या एका शेअरमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या व्यापाऱ्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. या दोघांच्या करस्थानाला बळी पडून संदीप यांनी रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर संदीप यांच्या फसवणुकीला नायजेरीयन जोडप्याने सुरुवात केली. मर्सी जॉन असल्याचं भासवून न्नाग्बूच्या बायकोने संदीपशी बोलण्यास सुरवात केली.  आपण यूकेमधील एका फार्मासिटिकल कंपनीत असल्याचं सांगितले. या हर्बल सीडच्या व्यावसायात खुप पैसे असल्याचं आमिष तिने संदीपला दाखवलं. पैसे दुप्पट होतील या आशेने संदीप यांनी आधी अडीच लाख रुपये भरुन हर्बल सीड भारतीय सप्लायरकडून विकत घेतले. विशेष म्हणजे या सीड पाहण्यासाठी न्नाग्बू कंपनीचा मालक बनून भारतात आला आणि संदीपला भेटला देखील. त्यानंतर 50 हर्बल सीड पेकेटची ऑर्डर असल्याचं सांगून संदीप सिंगकडून सप्लायरच्या अकाऊंटमध्ये 10 लाख रुपये आरटीजीएसच्या माध्यमातून दिलेल्या बँक खात्यावर डिपॉझिट केले. पैसे मिळताच मर्सी जॉन आणि भारतातील सप्लायर या दोघांचाही नंबर अचानक बंद झाला. त्यानंतर पैसे परत करण्याच्या नावाखाली पुन्हा एक लाख 26 हजरांची मागणी केली. आपले 12 लाख परत मिळतील या आशेने संदीप यांनी पैसे भरले देखील, पण 12 लाख तर सोडा नंतर गुंतवलेल्या पैशांचादेखील पत्ता नव्हता. आता मात्र संदीप यांना संशय आला आणि त्यांनी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार केली. नायजेरियन जोडपं दिल्लीतून आपली कारस्थानं करत असल्याचं लक्षात आल्यानंतर भांडुप पोलिसांची टीम दिल्लीला रवाना झाली. पण दिलेल्या पत्त्यावर हे जोडपं न भेटल्याने पोलिसांनी गुड फ्रायडेचा मुहूर्त बघून दिल्लीतील एका चर्चवर पाळत ठेवली आणि या दोघांना अटक केली. पोलिसांनी या दोघांकड़ून 14 मोबाइल, वेगवेगळ्या देशांचे सिम कार्ड, इंटरनेट डोंगल, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह, लॅपटॉप जप्त केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget