एक्स्प्लोर

Bhagat Singh Koshyari Controversy LIVE: राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तीव्र पडसाद, पाहा प्रत्येक अपडेट

भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari controversial statement) यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राचा (Maharashtra) अपमान केला आहे असं म्हणत सर्वपक्षीय आक्रमक झाले आहेत

LIVE

Key Events
Bhagat Singh Koshyari Controversy LIVE: राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तीव्र पडसाद, पाहा प्रत्येक अपडेट

Background

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari controversial statement) यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राचा (Maharashtra) अपमान केला आहे असं म्हणत विरोधकांसह सामान्य नागरिकांनी त्यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत.  गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे.  काल मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांचं हे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, त्यांना नारळ द्या अशी मागणी आता विरोधकांनी केली आहे. 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की,  महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला..स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका..मुख्यमंत्री शिंदे..राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे. 

राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर 

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे की,  राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे.

महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा, असं आमदार मिटकरींनी म्हटलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

'महाराष्ट्राचा घोर अपमान! 50 खोकेवाले कोणत्या झाडी डोंगरात लपलेत'; राज्यपालांविरोधात संजय राऊत आक्रमक, केले धडाधड ट्वीट

'गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही', राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधक आक्रमक

17:17 PM (IST)  •  30 Jul 2022

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या महाराष्ट्र द्वेषाला जाब विचारण्यासाठी राज्यभरातून दहा लाख पत्र पाठविण्यात येणार  

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या महाराष्ट्र द्वेषाला जाब विचारण्यासाठी आणि त्यांना कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने 1 ऑगस्ट पासून दहा लाख पत्र राज्यभरातून पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी दिली.

16:32 PM (IST)  •  30 Jul 2022

राज्यपालांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ; पुण्यातील शिवसैनिकांचा हल्लाबोल

Pune Shivsea: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आली आहे, असं म्हणत पुण्यातील शिसैनिकांनी आंदोलन केलं आहे. पुण्यातील गुडलक चौकात शिवसैनिकांनी एकत्र येत राज्यपालांविरोधात हल्लाबोल केला आहे. कोशारी मत करो होशारी असं लिहिलेले फलक हाती घेत शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. 

16:31 PM (IST)  •  30 Jul 2022

महाराष्ट्राच्या परंपरेचे भान असणारा व्यक्ती राज्यपाल म्हणून नेमावा : छत्रपती संभाजीराजेंची राष्ट्रपती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई बाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी आज ट्विट करीत एकप्रकारे भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटविण्याची व याठिकाणी महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व त्याबद्दल आदर असणारा योग्य व्यक्ती नेमावा, असे म्हटले आहे.

15:26 PM (IST)  •  30 Jul 2022

राज्यपालांवर केंद्र सरकारचं नियंत्रण असायला हवं - दीपक केसरकर 

राज्यपालांची भाषण लिहून देणा-या विभागात सुधारणा होण्याची गरज आहे. त्यांना जे लिहून दिलं जातं ते तेच वाचतात. राज्यपालांवर केंद्र सरकारचं नियंत्रण असायला हवं. मुख्यमंत्री सध्या दौ-यावर आहेत, ते आल्यावर त्यांची भेट घेतील, असे केसरकर म्हणाले. 

15:16 PM (IST)  •  30 Jul 2022

रायगड - आता रेल्वेत मिळणार हक्काची जागा

दूर पल्ल्याच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षण आधी केले जाते..आरक्षण सीट कन्फर्म झाल्यानंतर उर्वरित उपलब्ध राहिलेल्या सीट कोणाला द्यायची यावर टीसीची मक्तेदारी चालायची.या मक्तेदारीला आळा बसण्यासाठी आता 'हॅण्ड हेल्ट टर्मिनल' ही प्रणाली अस्तित्वात आणली आहे.त्यामुळे टीसीची मक्तेदारी संपून प्रवाश्यांना आपली हक्काची जागा मिळणार आहे.रेल्वे प्रशासनाने प्रत्येक विभागाला 'एच एच टी' मशीन देण्यात आले आहेत..

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRohit Pawar on Ajit Pawar : अजित पवारांचा टोला , रोहित पवारांची टीकाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Amisha Patela Dating With Nirvaan Birla: कोण आहे बिझनेसमन निर्वाण बिर्ला? ज्याच्या मिठीत शिरलीये गदर फेम 49 वर्षांची अमिषा पटेल, अफेअरच्या चर्चा?
"मेरे डार्लिंग के साथ प्यारी शाम..."; 49 वर्षांच्या अमिषा पटेलनं शेअर केला रोमॅन्टिक फोटो, कुणाला करतेय डेट?
Embed widget