एक्स्प्लोर

Mumbai Rain Update : मुंबईकरांनो सावधान! पावसाचा धोका वाढला, यलो अलर्ट बदलून ऑरेंज अलर्ट जारी 

MMRDA Rain Update : मुंबईसह आसपासच्या परिसरात अर्था एमएमआरडीए भागात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे पुढील काही काळातच मुंबईसह आसपासच्या परिसरातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली असून यामुळेच मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने यलो अलर्ट बदलून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Rain Update : मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर अशाप्रकारे जवळपास संपूर्ण एमएमआरडीए (MMRDA) परिसरात गेल्या काही तासांपासून तुफान पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी तर अतिमुसळधार पाऊस सुरु असून हा पाऊस वाढण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळेच मुंबईसह परिसरातील यलो अलर्ट आता बदलून ऑरेंज अलर्ट झाला आहे. म्हणजेच याठिकाणी देण्यात आलेला  धोक्याचा ईशारा आता आणखी वाढला आहे. तसंच या सर्व ठिकाणी पुढील काही दिवस आणखी अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे.

पुढील काही दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने दिली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा असल्यानं तसेच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं मुंबईसह परिसर आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबईततर सायंकाळी पावसाचा जोर आणखी वाढू शकतो, असंही समोर आलं आहे. पुढील दिवसानंतर हाच मुंबईतील पावासाचा जोर आणखी वाढेल असंही यावेळी सांगण्यात आलं आहे. तर डोबिंवली परिसरात मागील 3 तासात 85 मिमी पावसाची आणि नवी मुंबईतील कोपरखैरणा येथे 3 तासात 87.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसंच भिवंडी शहरात देखील रविवारपासून उघडीप दिलेल्या पावसाने दुपारी तीन वाजल्यापासून दमदार पुनरागमन केलं आहे. या दोन तास सुरू राहिलेल्या पावसात भिवंडी शहरातील अनेक भागात रस्त्यावर पाणी साचले असून भिवंडी ग्रामीण भागात देखील पावसाचे पाणी सखलभागात साचत आहे. 

कोकणातही तुफान पाऊस सुरुच असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याठिकाणी ऑरेंज अलर्ट कायम आहे. तसंच पुढील काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई-गोवा हायवेवर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यात मंगळवारपासून मुंबईसह राज्यभरातील बऱ्याच भागात पाऊस पुन्हा जोमात सक्रिय होणार अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने नुकतीच दिली आहे.

राज्यातील विविध ठिकाणची पावसाची आकडेवारी (सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत)

महाबळेश्वर - 94.6 मिमी 
मुंबई (कुलाबा) - 27 मिमी 
मुंबई (सांताक्रुज) - 19.2 मिमी 
कोल्हापूर - 21.8 मिमी 
रत्नागिरी - 51.3 मिमी 
अलिबाग - 24.3 मिमी 
ठाणे - 59 मिमी 
माथेरान - 70 मिमी 
डोंबिवली - 104 मिमी

हे ही वाचा :

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
Vishakha Raut : उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
Mumbai Ganeshotsav 2026 Local Train And Metro: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget