एक्स्प्लोर

BEST कामगारांसाठी 'बेस्ट' निर्णय; 725 कामगारांना सेवेत कायमस्वरूपी करणार

BEST Contract Workers Will be Permanent Employed: बेस्ट उपक्रमातील 725 पैकी 123 कंत्राटी कामगारांना बेस्ट उपक्रम सेवेत कायमस्वरूपी करण्यात येणार आहे. उर्वरित कामगारांनाही टप्प्याटप्प्यानं कायमस्वरुपी सेवेत रुजू करुन घेणार

BEST Recrupment News Updates: बेस्ट (BEST) उपक्रमातील 725 पैकी 123 कंत्राटी कामगारांना बेस्ट उपक्रम सेवेत कायमस्वरूपी करण्यात येईल, असं आश्वासन काल (26 ऑक्टोबर 2023, गुरुवार) महापालिका आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापक यांच्याकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना देण्यात आलं आहे. येत्या दोन दिवसांत ऑर्डर काढून 123 कामगारांना सेवेत समाविष्ठ केलं जाईल आणि उर्वरित कामगारांना इतर ठिकाणी समाविष्ट करण्यात येईल, अशी ग्वाही महापालिका आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापक यांच्याकडून देण्यात आली आहे. 

कंत्राटी कामगारांचा कायमस्वरूपी बेस्ट उपक्रम सेवेत समावेश करावा, या मागणीसाठी गेल्या आठवड्यात बेस्ट कामगारांनी आझाद मैदानात उपोषण पुकारलं होतं. या कामगारांनी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेतली होती. त्यावेळी दानवे यांनी त्या कामगारांना बेस्ट उपक्रम सेवेत समाविष्ट करण्यासाठी बैठक लावून तोडगा काढणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आज महापालिका मुख्यालयात दानवे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्यासह बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांच्यासोबत बैठक पार पडली.

आधी 123 त्यानंतर उर्वरित कामगारांना सेवेत कायमस्वरूपी करणार 

या बैठकीत बेस्ट उपक्रमातील 725 पैकी 123 कंत्राटी कामगारांना बेस्ट उपक्रम सेवेत कायमस्वरूपी करण्यासाठी येत्या एक दोन दिवसांत ऑर्डर काढून त्यांना सेवेत समाविष्ट करण्यात येईल, तर उर्वरित कामगारांना इतर ठिकाणी समाविष्ट करण्यात येईल, अशी ग्वाही  महापालिका आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापक यांच्याकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना देण्यात आली.

दरम्यान, बैठकीसाठी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, सुहास सामंत ( अध्यक्ष बेस्ट कामगार सेना), अनिल पाटणकर (माजी अध्यक्ष बेस्ट), रंजन चौधरी (सरचिटणीस बेस्ट कामगार सेना), उपाध्यक्ष उमेश सारंग  मनोहर जुन्नर, गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
Salman Khan : सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
Prithviraj Chavan: भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Heeramandi : 'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 80 : आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines  : 8 AM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGhatkopar hoarding collapse :घाटकोपर पेट्रोल पंपावर महाकाय बॅनर कोसळला, मृतांचा आकडा 14 वर:ABP MajhaTOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 14 मे 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
Salman Khan : सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
Prithviraj Chavan: भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Heeramandi : 'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
Ghatkopar Hoarding Falls: अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
अरे झालंय काय,वागताय काय! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी ईशान्य मुंबईच्या 'भावी' खासदारांमध्ये जुंपली
अरे झालंय काय,वागताय काय! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी ईशान्य मुंबईच्या 'भावी' खासदारांमध्ये जुंपली
Weather Updates: पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
Shah Rukh Khan : शाहरुख खानने 'या' चित्रपटात दिलाय इंटिमेट सीन; पण चाहत्यांना कधीच पाहता येणार नाही 'हा' सिनेमा
शाहरुख खानने 'या' चित्रपटात दिलाय इंटिमेट सीन; पण चाहत्यांना कधीच पाहता येणार नाही 'हा' सिनेमा
Embed widget