एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस पगारातून कापणार नाही!
बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी 45 हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 5 हजार 500 रुपये बोनस देण्यात आला होता.
मुंबई : मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळालेला दिवाळी बोनस आता त्यांच्या पगारातून कापला जाणार नाही.
या संदर्भात मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि बेस्टचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांच्यात बैठक झाली. या बैठकीत पालिका आयुक्तांनी बेस्ट अध्यक्षांना बोनस पगारातून कापणार नसल्याचं आश्वासन दिलं.
बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी 45 हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 5 हजार 500 रुपये बोनस देण्यात आला होता. त्यासाठी मुंबई महापालिकेने बेस्टला 21 कोटी 64 लाख रुपये दिले होते. मात्र, बेस्टमधील आर्थिक सुधारणांची प्रक्रिया तात्काळ सुरु करण्याची अट घातली होती.
दिवाळी बोनस दिल्यावर बेस्टमध्ये आर्थिक सुधारणा सादर झाल्या नाहीत तर दिलेला बोनस हफ्त्याने कर्मचाऱ्यां पगारातून कापू, असं महापालिकेने म्हटलं होतं. त्यानुसार महापालिकेने आर्थिक सुधारणांची यादी प्राप्त न झाल्याने बोनस हफ्त्याने वसूल करण्याचंही निश्चित केलं होतं.
मात्र, बेस्ट अध्यक्षांनी 80% सुधारणा सुचवल्याने महापालिकेने बोनस कापण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
संबंधित बातम्या
बेस्ट कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस पगारातून कापणार
मुंबईकरांचा 'बेस्ट' प्रवास महागणार, 12 रुपयांपर्यंत तिकीट दरवाढ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement