एक्स्प्लोर
Advertisement
बेस्टचा अर्थंसंकल्प आता महापालिकेच्या अर्थसंकल्पात मांडला जाणार
बेस्टचा अर्थसंकल्प आता मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात मांडला जाणार आहे. बेस्ट समितीनं आज झालेल्या बैठकीत या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला आहे.
मुंबई : बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यास बेस्ट समितीनं मंजुरी दिली आहे. बेस्ट सध्या ज्या आर्थिक संकटात आहे, त्या परिस्थितीत बेस्टचा अर्थसंकल्प महापालिका अर्थसंकल्पामध्ये विलीन होणं हा महत्वाचा निर्णय मानला जात आहे.
ज्याप्रमाणे यावर्षीपासून केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातच रेल्वे अर्थसंकल्प समाविष्ट करण्यात आला आहे, त्याचप्रमाणे बेस्टचा अर्थसंकल्पही महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन व्हावा अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. मात्र बेस्ट समितीने संमत केलेला हा निर्णय महापालिका सभागृहात मंजुरीसाठी येईल आणि त्यानंतर नगरविकास खात्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येईल.
बेस्ट अर्थसंकल्प महापालिका अर्थसंकल्पात विलीन करण्याचा अंतीम निर्णय झाला तर बेस्टच्या कामगिरीचा थेट परिणाम महापालिकेच्याच तिजोरीवर पडणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement