एक्स्प्लोर
मुंबईत ओव्हलवर बेल्जियमच्या राजा-राणीचं क्रिकेट
राणी माथिल्डे यांनी घुमवलेली बॅट पाहून राजाही काही क्षण थक्क झाला.

मुंबई : एरवी क्रिकेटपटूंनी गजबजलेलं ओव्हल मैदान आज अनोख्या क्षणांचं साक्षीदार ठरलं. चक्क बेल्जियमचा राजा फिलीप आणि राणी माथिल्डे यांनी मुंबईतील ओव्हल मैदानावर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. 44 वर्षीय माथिल्डे यांनी घुमवलेली बॅट पाहून राजाही काही क्षण थक्क झाला. त्यानंतर राणीने हातात चेंडू घेऊन बॉलिंगही केली. युनिसेफतर्फे लहान मुलांसाठी आयोजित क्रिकेट मॅचला राजा-राणी हजेरी लावली. बेल्जियमचे राजा-राणी सात दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी जगप्रसिद्ध ताजमहाललाही भेट दिली. विशेष म्हणजे क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने क्रिकेटमधील काही ट्रिक्सचा कानमंत्र राजा फिलिप यांना दिला. यानंतर वीरुही लहान मुलांमध्ये रमताना दिसला. छोट्या क्रिकेटवीरांना सेहवागने क्रिकटचे धडे दिले. मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करा, मुलींची लग्नं लवकर करुन देण्यापेक्षा त्यांना शिकू द्या, खेळू द्या असं आवाहनही यावेळी सेहवागने देशवासियांना केलं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















