एक्स्प्लोर
सुरक्षारक्षकाला कानशिलात मारण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश
मुंबई: आपल्या बंगल्याची माहिती दिल्यावरुन मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी आपल्या बंगल्याबाहेरच्या सुरक्षारक्षकाच्या कानशिलात मारण्याचे आदेश सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्यास दिले. असा आरोप म्युनिसिपल मजदूर सघटनेनं केला आहे. दरम्यान, याप्रकरणी संघटनेनं आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांच्या आदेशावरुन सहाय्यक सुरक्षा अधिकारी यांनी बंगल्याबाहेरील सुधाकर मदने या सुरक्षारक्षकास दोन कानशिलातही लगावल्या.
सुरक्षा रक्षक आणि कामगारांना दिलेल्या अश्या हीन दर्जाच्या वागणुकीची दखल घेतली जावी. तसंच, अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांच्या बंगल्याचं सीसीटिव्ही फुटेज तपासलं जावं आणि याची पोलीस चौकशी केली जावी. अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियन ने केली आहे.
या सर्व प्रकारामुळे युनियनच्या कामगारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. उद्या संघटनेचे पदाधिकारी अतिरीक्त आयुक्त संजय मुखर्जींसह आयुक्तांची भेट घेणार आहेत. भेटीतून काही निष्पन्न न झाल्यास मोर्चा काढण्याच्या तयारीत संघटना आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement