एक्स्प्लोर
अधिवशेनात आक्रमक व्हा, उद्धव ठाकरेंचे सेना आमदारांना आदेश
'मेक इन इंडिया' आणि 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'मध्ये करण्यात आलेल्या घोषणांचा पाठपुरावा करण्याच्या सूचनाही उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत.

फाईल फोटो
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमक व्हा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व मंत्री आणि आमदारांना दिले आहेत. मुंबईतील ‘ट्रायडंट’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना आमदार आणि मंत्र्यांची बैठक पार पडली. नाणार प्रकल्प, सातवा वेतन आयोग, शेतकऱ्यांची कर्जमाफी या विषयांवर सरकारला धारेवर धरण्याच्या सूचनाही उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिल्या आहेत. तसेच, लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावाची यादी जाहीर करण्याची मागणी करण्यासही सांगितले. 'मेक इन इंडिया' आणि 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'मध्ये करण्यात आलेल्या घोषणांचा पाठपुरावा करण्याच्या सूचनाही उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत. एकंदरीत अर्थसंकल्प मंजूर होण्यासाठी सरकारचा कस लागणार असल्याचे दिसते आहे. शिवसेनेच्या विरोधामुळे अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी मतदान होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, संसदीय गटनेते खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदारांची उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली. बैठक किंवा अधिवेशनाला खासदार उपस्थित राहत नसल्याने अडसूळ यांनी नाराजी व्यक्त केली.
Before You Go
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही






















