एक्स्प्लोर

BBC Documentary Row: जेएनयू, जामियाचं लोण महाराष्ट्रात, 'बीबीसी'चा मोदींवरील माहितीपट दाखवण्यास मुंबईतील 'टीस'चा नकार

BBC Documentary Screening Row: 'बीबीसी'चा मोदींवरील माहितीपट संस्थेच्या परिसरात माहितीपट दाखवल्यास कारवाई करण्याचा 'टीस'ने इशारा दिला आहे

BBC Documentary Screening Row: गुजरात दंगलीला आता 20 वर्षे उलटून गेलीत. पण त्याच घटनेवर आधारित नुकतीच प्रदर्शित झालेली बीबीसीची एक डॉक्युमेंटरी मात्र सध्या वादात आहे. या माहितीवरून  जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU), जामिया विद्यापीठात  राडा झाला. या पार्श्वभूमीवर आता 'बीबीसी'चा मोदींवरील माहितीपट दाखवण्यास मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ  सोशल सायन्सने (टीस) ने नकार दिला आहे.  संस्थेच्या परिसरात माहितीपट दाखवल्यास कारवाई करण्याचा 'टीस'ने इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने नकार दिला आहे.


BBC Documentary Row: जेएनयू, जामियाचं लोण महाराष्ट्रात, 'बीबीसी'चा मोदींवरील माहितीपट दाखवण्यास मुंबईतील 'टीस'चा नकार

'टीस'ने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की,  इन्स्टिट्यूटमधील काही विद्यार्थी मोंदीवरील माहितीपट संस्थेच्या प्रांगणात दाखवण्याची तयारी करत आहे. या माहितीपटावरून देशातील काही संस्थेत अशांतता निर्माण झाली आहे. तसेच  या माहितीपटाला विरोध करण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी संस्थामध्ये बैठका देखील घेतल्याची माहिती देखील मिळत आहे.  त्यामुळे संस्थेतील विद्यार्थ्यांना सूचना करण्यात येत आहे की, अशा कोणत्याही कृतीत सहभागी झाल्यास विद्यार्थ्यांवर  शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.  

दरम्यान TISS विद्यार्थी संघटनेचे नेता प्रतीक परमे म्हणाला की, संस्थेतील  विद्यार्थ्यांनी अशा कोणत्याही माहितीपटाचे स्क्रिनिंग करण्याची योजना आखलेली नाही.  माहितीपटाबद्दल आम्हाला  संचालकांकडून नियमावली मिळाली आहे. परंतु आम्ही असा कोणताही माहितीपट प्रदर्शित करण्याचा विचार करत नाही. परमे म्हणाले की, प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरम (PSF) ने हे स्क्रिनिंग आयोजित केल्याची माहिती आहे.  परंतु आम्ही त्याचा भाग नाही.

 

बीबीसीच्या ' ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ या माहितीपट मालिकेबाबत बरेच वाद आहेत. ही मालिका भारतात उपलब्ध नाही, पण त्याच्या लिंक्स यूट्यूब आणि ट्विटरवर शेअर करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने डॉक्युमेंटरीचे एपिसोड असलेले यूट्यूब व्हिडिओ आणि ट्विटर लिंक ब्लॉक केले आहेत. तसेच परराष्ट्र मंत्रालयाने हा माहितीपट 'प्रचाराचा भाग' म्हणून नाकारला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की त्यात वस्तुनिष्ठतेचा अभाव आहे आणि वसाहतवादी मानसिकता प्रतिबिंबित करते असे सरकारने म्हटले. 

'इंडिया द मोदी क्वेश्चन' एवढा वाद का सुरु आहे?

  • 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी बीबीसीची ही 59 मिनिटांची डॉक्युमेंटरी आहे
  •  ब्रिटिश फॉरेन ऑफिसच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं हा माहितीपट तयार करण्यात आलाय
  •  भाजप समर्थकांचं म्हणणं आहे की, सुप्रीम कोर्टानं याबाबत एकदा निर्णय दिल्यानंतर विदेशी मीडिया अजूनही यात मोदींना अडकवू पाहतोय
  • तर दुसरीकडे बीबीसी आपल्या माहितीपटावर ठाम आहे, सर्व मतांना स्थान देऊन भारताच्या इतिहासातली एका महत्वाच्या घटनेवर हा माहितीपट बनवल्याचा त्यांचा दावा आहे. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Embed widget