एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बदलापूरमधील कोंडेश्वर धबधब्यावर तीन दिवस जमावबंदी
वीकेंड, गटारी आणि त्यात अतिउत्साही पर्यटक यांच्या पार्श्वभूमीवर बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्यावर पुढील तीन दिवस जमावबंदी करण्यात आली आहे.
बदलापूर: बदलापूरमधील कोंडेश्वर धबधब्यावर तीन दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. वीकेंड, गटारी आणि त्यात अतिउत्साही पर्यटक यांच्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यटकांचा मात्र हिरमोड होणार आहे.
मुंबईपासून सर्वात जवळ आणि सहज पोहोचू शकणारा पिकनिक स्पॉट असलेल्या कोंडेश्वरला पर्यटक दरवर्षी तुफान गर्दी करतात. मात्र, मागच्या आठवड्यात इथं एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला होता, तर पोलिसांनी तब्बल २५ पर्यटकांना बुडताना वाचवलं होतं.
श्रावण महिना सुरु होण्यापुर्वीचा हा वीकेंड आहे. त्यामुळं मोठी गर्दी होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून २१ ते २३ जुलैदरम्यान कोंडेश्वरला जमावबंदी आदेश लागू करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
ठाणे
जॅाब माझा
Advertisement