एक्स्प्लोर
महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरेंचं अंडरग्राऊण्ड स्मारक
मुंबईतील महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरेंचं अंडरग्राऊण्ड स्मारक बांधण्याच्या प्रस्तावाला हेरिटेज समितीने मंजुरी दिली आहे

महापौर बंगला
मुंबई : मुंबईतील महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं अंडरग्राऊंड स्मारक बांधलं जाणार आहे. हेरिटेज समितीने अंडरग्राऊंड स्मारकाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. दादरमध्ये असलेल्या महापौर बंगल्याच्या आवारात अनेक जुनी झाडं आहेत. ही झाडं न तोडता बंगल्याखाली स्मारक उभाण्यात येणार आहे. महापौर बंगल्याची 2300 स्क्वेअर फुटाची जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी कमी पडली असती. नऊ हजार स्क्वेअर फूट जागेत बाळासाहेबांचं अंडरग्राऊंड स्मारक तयार होणार आहे. बंगल्याच्या मागच्या आणि पुढच्या जागेचाही स्मारकासाठी वापर केला जाणार आहे. बंगल्याच्या आतील खोल्या आणि दालनांमध्ये बाळासाहेबांचे फोटो, स्मरणचित्रं, व्यंगचित्रं लावली जातील. स्मारकात तयार करण्यात येणारी गॅलरी, हॉल अशा वास्तू अंडरग्राउंड असतील. सध्याची महापौर बंगल्याची वास्तू ही हेरिटेज असल्यामुळे तिच्या मूळ रचनेत कोणतेही बदल केले जाणार नाहीत.
Before You Go
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय






















